Pune crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: दहावीत चांगले मार्क्स मिळवून देतो..., भोंदूबाबाकडून १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुणे हादरले

Pune fake godman: पुण्यामध्ये भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. दहावीत चांगेल मार्क्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत भयंकर कृत्य केले.

Priya More
  • पुण्यात भोंदूबाबाने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले

  • दहावीत चांगले मार्क मिळवून देण्याचे आमिष दाखवले

  • पुण्यातील स्वयंघोषित भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

  • वडगाव मावळमध्ये भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हा

अक्षय बडवे, पुणे

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा अतिशय किळसवाणा चेहरा समोर आला आहे. स्वतःकडे अलौकिक आणि दैवी शक्ती असल्याचा बनाव करून या भोंदूबाबाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवर्य म्हणून स्वतःची ओळख सांगून लोकांमध्ये स्वतःबद्दल एक प्रकारची भीती निर्माण करत असे. याच गोष्टीचा फायदा घेत त्याने अनेकांची फसवणूक केली.

एका अल्पवयीन मुलीला दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क पाडून देतो असे सांगत या भोंदूबाबाने तिला आपल्या मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र म्हणण्याचा बहाणा केला आणि तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या आख्यारीतील वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रद्धेच्या आणि देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेचा काळा बाजार चालवणारा हा भोंदू स्वप्नील लांडे सध्या फरार आहे. या भोंदूबाबचा पुणे पोलिस सध्या सोध घेत आहेत.

या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे. या भोंदूबाबाने 'भविष्यात कोणतीही अडचण आल्यास किंवा संकट आल्यास थेट माझ्याकडे ये, मी सर्व ठीक करेन.', अशी भावनिक साद घालत तिची मानसिक फसवणूक करत असभ्य आणि गैरवर्तन केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. भोंदूबाबाच्या या कृत्यामुळे पीडित मुलीला मानसिक धक्का बसला.

आरोपीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपी लांडेने अशाच पद्धतीने धर्माचा आणि चमत्कारांचा धाक दाखवून आणखी कोणाची आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषण केले आहे का? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. अशाप्रकारच्या भोंदूबाबांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT