Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

Pimpari-Chinchwad Crime: पुण्यातील मोशीमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. शेजारी राहणाऱ्या तरुणाने या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More

Summary -

  • पुण्यातील मोशी परिसरात ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

  • शेजाऱ्याने फूस लावून घरात नेऊन केला बलात्कार

  • आईने खिडकीतून पाहिल्यानंतर प्रकार उघड

  • आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

  • भोसरी पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुण्यामध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशीमध्ये ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणाने या मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी आरोपी रामू कुंजल निसादविरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली. आरोपी रामू कुंजल निसादने शेजारी राहणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीला फूस लावत आपल्या घरामध्ये बोलावून घेतलं. यावेळी आरोपीने या मुलीवर बलात्कार केला. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही त्याने या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल अशी धमकी त्याने तिला दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेबद्दल कुणालाच काही सांगितले नाही.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ एप्रिलला सकाळी त्याने या मुलीला पुन्हा घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या घरातून येत असलेला आवाज ऐकून पीडित मुलीची आई आणि आत्याने खिडकितून डोकावून पाहिले त्यावेळी आपल्या मुलीची अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास भोसरी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा राडा; पदावरून उचलबांगडी केल्याने ऑफिस फोडलं, AC, पंखे, खुर्च्यां घरी नेल्या

गाडी अडवली, कॉलर पकडली, खेचत नेलं...; टेस्ट क्रिकेटरला पोलिसांकडून बेदम मारहाण

Kidney Damage: किडनी 95% खराब होईपर्यंत दिसत नाहीत लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले सुरक्षित ठेवण्याचे 8 महत्त्वाचे उपाय

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग खूप झालेत? मग हा मास्क तुमचे सगळे प्रॉब्लेम्स करतील दूर

SCROLL FOR NEXT