'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

jay pawar latest news : अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात रोहित पवारांपाठोपाठ जय पवारांनीही उडी घेतलीय.. जय पवारांनी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगबाबत मोठं वक्तव्य केलंय.. जय पवार नेमकं काय म्हणालेत...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
jay pawar on ajit pawar accident
jay pawar Saam tv
Published On

दोन महिन्यानंतरही अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.. तर पोलीस व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगवर एफआयआर दाखल करायला टाळाटाळ करत आहेत.. मात्र रोहित पवारांपाठोपाठ अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करण्याची पहिल्यांदाच मागणी केल्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण उचल खाण्याची शक्यता आहे.

jay pawar on ajit pawar accident
निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत घातपाताचा संशय व्यक्त केला... एवढंच नाही तर पुराव्यांसह अनेक गौप्यस्फोट केले.. त्यामुळे या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांचं मोहोळ उठलं होतं.. याच दरम्यान डीजीसीएच्या प्राथमिक रिपोर्टमध्ये व्हीएसआर कंपनीच्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवलं... त्यामुळे रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.... तर जय पवारांनीही रोहित सिंगचा विमानाच्या पायलट सीटवर झोपा काढत असल्याचा व्हिडीओ जारी करत त्याच्या अटकेची मागणी केली होती.

दुसरीकडे अजित दादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांकडून गौप्यस्फोटांची मालिका सुरू असताना जय पवारांनीही पत्रकार परिषद घेण्याचं जाहीर केलं.. मात्र अचानक ही पत्रकार परिषद रद्द केली.. त्यावरही जय पवारांनी भाष्य केलंय..

jay pawar on ajit pawar accident
Rohit Pawar : महाभागालाच NCP पक्ष ताब्यात घ्यायचा होता, तटकरेंकडून अप्रत्यक्ष रोहित पवारांचा डोमकावळा म्हणून उल्लेख

आतापर्यंत डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला दोषी ठरवलं असलं तरी एएआयबीच्या रिपोर्टमध्ये मात्र खराब हवामानाचं कारण दिलंय... त्यामुळे रोहित पवारांनंतर आता जय पवारांनीही या प्रकरणात उडी घेतल्यानं आता तरी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक होणार का? तसंच संपूर्ण अहवाल आल्यानंतर बोलणार असल्याचं सांगून जय पवार भविष्यात आणखी कुठले पत्ते बाहेर काढणार याची उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com