Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! ५ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, झुडपात फेकला मृतदेह

Pune Police: पुण्यात ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मावळमध्ये ही घटना घडली. चिमुकलीचा मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी ३० वर्षीय तरुणाला अटक केली.

Priya More

Summary -

  • पुण्यात बलात्कार आणि हत्याकांडाची भयंकर घटना घडली

  • मावळमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली

  • मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आला

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली

दिलीप कांबळे, मावळ (पुणे), साम टीव्ही

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात हादरवून टाकणारी घटना घडली. ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मावळच्या गुडुंब्रे गावात घडली. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या गोडुंबरे गावामध्ये ५ वर्षांची मुलगी आपल्या आई-वडील आणि भावासोबत राहत होती. मुलीचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी या गावात आले होते. ते खेळणी तयार करणाऱ्या कंपनीत कामाला होते. कामाला जाताना रोज ते आपल्या मुलांना घरी ठेवूनच जायचे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी कामावर गेले आणि त्यांच्या मुलीसोबत ही भयंकर घटना घडली.

समीर कुमार मंडल या तरुणाने घरामध्ये कुणी नसल्याचा फायदा घेतला आणि चिमुकलीला सोबत घेऊन गेला. आरोपीने या चिमुकलीवर बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला. त्यानंतर आरोपी फरार झाला. मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घरात मुलगी दिसली नाही. त्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तेव्हा मुलीचा मृतदेह झाडाझुडपात आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच परंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलीच्या मृतदेहाची अवस्था पाहून तिच्यावर बलात्कार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT