बलात्कार अन् प्रायव्हेट पार्टमध्ये कापडाचे तुकडे... क्रूर बॉयफ्रेंडनं विवाहित महिलेला छळलं, शेवटी तिनं आयुष्य संपवलं

Married Woman Dies After Alleged Assault by Lover: कानपूरच्या जगदीशपूर गावात २१ वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कुटुंबाने विवाहित महिलेच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत.
Married Woman Dies After Alleged Assault by Lover
Married Woman Dies After Alleged Assault by LoverSaam Tv Marathi
Published On

कानपूरच्या बिधानू पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूर गावातून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. २१ वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबाने आरोप केला की, विवाहित महिला आपल्या प्रियकरासोबत त्य़ाच्या घरातच राहत होती. आरोपी प्रियकराने आधी विवाहित महिलेवर बलात्कार केला. नंतर तिच्या गुप्तांगात कापडाचे तुकडे भरले. या वेदनेला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं. मृत महिलेच्या वडिलांनी आरोपी प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसी (वय वर्ष २१) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. तीन वर्षांपूर्वी मानसीचे लग्न झाले होते. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे नऊ महिन्यांपूर्वी मानसीची बिधानू पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूर गावातील रहिवासी मनीष यादवशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सहा महिन्यांपूर्वी मानसी वडिलांच्या घरात एका कार्यक्रमानिमित्त गेली होती.

Married Woman Dies After Alleged Assault by Lover
शरद पवारांचा ८५ वा वाढदिवस, अजित पवारांकडून शुभेच्छा; पाहा VIDEO

यादरम्यान, संधी साधून मानसी मनीषसोबत पळून गेली. याची माहिती मिळताच मानसीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दाखल केली. दहा दिवसानंतर मानसी पोलीस स्टेशनमध्ये गेली. तसेच मर्जीने मनीषसोबत गेली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी याबाबत कुटुंबाला माहिती दिली.

गेल्या सहा महिन्यांपासून तिचे मनीषसोबत अनैतिक संबंध होते. ती त्याच्या घरात होती. घटनेच्या दिवशी पोलिसांना मानसी रूग्णालयात असून, तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मानसीच्या कुटुंबाला या घटनेबाबत माहिती दिली. कुटुंबाने रूग्णालयात धाव घेतली. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबाने पोलिसांकडे मनीषविरोधात तक्रार दाखल केली.

Married Woman Dies After Alleged Assault by Lover
समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मानसीची आई म्हणाली, 'मनीषने माझ्या मुलीला मारले आहे. मनीषने आधी मानसीवर बलात्कार केला. नंतर तिच्या गुप्तांगात कपडे भरले. याच छळाला तिनं विष पिऊन आत्महत्या केली', असा आरोप केला. दरम्यान, आरोपी फरार असून, सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com