समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Major Accident on Samruddhi Expressway: यवतमाळवरून शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Major Accident on Samruddhi Expressway
Major Accident on Samruddhi ExpresswaySaam
Published On

समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. यवतमाळवरून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना पीकअप मालवाहू वाहन आणि कारचा भीषण अपघात घडला. कारमधून भाविक देवदर्शनासाठी जात होते. मात्र, शिर्डीला पोहोचण्याआधीच वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन हद्दीत हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच तर, दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री घडला असून, पोलिसांची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन हद्दीत हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती आहे. यवतमाळहून काही जण कारमधून प्रवास करत होते. ते शिर्डीच्या दिशेनं जात होते. मात्र, शिर्डीला पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा भीषण अपघात घडला.

Major Accident on Samruddhi Expressway
आता वंदे भारतचा प्रवास होईल स्वस्त; फक्त १ ऑपशनवर क्लिक करा; ३०० रूपयांपर्यंत होईल बचत

समृद्धी महामार्गवर भरधाव पीकअप वाहनानं अचानक ब्रेक मारला. यामुळे भरधाव वेगात धावणारी कार अनियंत्रित होऊन या पिकअपवर धडकली. या अपघातात कार चालक मंगेश आणि विक्रम अशोकराव सौरगपते( वय ४०) रा. यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुकूल मनोज यादव (वय ३५) रा.दत्त चौक यवतमाळ आणि मयूर दीपक डोनाडकर (वय २९ )रा.दत्त चौक यवतमाळ हे गंभीर जखमी झाले.

Major Accident on Samruddhi Expressway
परीक्षा देऊन घराकडं निघाली, वाटेत तिघांनी अडवलं; झुडपात नेत सामूहिक बलात्कार, पीडितेची प्रकृती नाजूक

अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. सध्या जखमींवर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com