Pimpari Chinchwad Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : व्हॅलेंटाईन डेला भयंकर घडलं, तरुणानं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक कारण उघड

Pimpari Chinchwad Crime News : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चिंचवडमध्ये २३ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चिंचवडमध्ये २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

  • प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय

  • मित्र बाहेर असताना रूममध्ये एकट्याने गळफास घेतला

  • चिंचवड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, तपास सुरू

गोपाळ मोटघरे, पुणे

सर्वत्र आज व्हॅलेंटाईन डेचं वातावरण असून तरुणाईसाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तरुण मंडळी या दिवशी एकमेकांच्या प्रति असलेलं प्रेम व्यक्त करतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. मात्र व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या प्रेमसंबंधातून केली असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुद्वारा चौका जवळील एका घरात समर्थ संजय माली ( २३ वर्षे) या तरुणाने काही वेळापूर्वी गळफास घेत आत्महत्या केली आहे. समर्थ माळी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र तो मागील काही दिवसापासून आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील गुरुद्वारा कॉलनी परिसरात आपल्या मित्रांबरोबर राहायला होता.

आज दुपारी त्याचे मित्र मेसवर जेवण करायला बाहेर गेले असता त्याने रूममध्ये कोणीही नसताना गळफात घेत आपलं जीवन संपवल. प्राथमिक तपासात समर्थने प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान त्याच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. समर्थ माळी याने आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल का उचलला? याचा तपास सध्या चिंचवड पोलीस करत आहेत. समर्थ माळी आत्महत्या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Saree Contrast Blouse: पांढऱ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Maharashtra Live News Update : ठाकरे सेनेने विश्वासघात केला, वंचितच्या माजी शहरप्रमुखाचा गंभीर आरोप

Mahashivratri Fast Rules: महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये?

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा 'तो' व्हिडिओ

Valentine Day Tragedy : व्हॅलेंटाइन डेला प्रेमाचा भयानक शेवट; बंद कारमध्ये आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह

SCROLL FOR NEXT