मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर मेट्रोचा स्लॅब कोसळला
रिक्षा आणि चारचाकी वाहनांचे नुकसान
घटनेत अनेकजण जखमी
अग्निशमन दल तात्काळ दाखल
बांधकाम सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मयूर राणे, मुंबई
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड येथे मेट्रोचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत एक ऑटो रिक्षा आणि चार चाकी गाडीवर स्लॅब कोसळला आहे. यामध्ये दोघेजण जखमी तर काहीजण अडकले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक मोठा भाग चालत्या रिक्षावर कोसळला. मेट्रोच्या खांबाचा काही भाग धावत्या रिक्षावर कोसळला असून यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
ही घटना दुपारी सुमारे 12.20 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून (MFB) देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो प्रशासन, महापालिकेचे वॉर्ड कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
बचावकार्य सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे एलबीएस रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. बांधकामाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.