१९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
पिंपरी-चिंचवडच्या थेरगावमध्ये घडली घटना
प्रेमसंबंधाच्या वादातून चाकू आणि चॉपरने सपासप वार करण्यात आले
या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी अटक केली
पुण्यामध्ये गु्न्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हत्या, आत्महत्या, बलात्कार, अपहरण या सारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हा तरुण जामिनावर सुटून बाहेर आला होता. प्रेमसंबंधाच्या वादातून त्याची हत्या करण्यात आली. पिंपरी- चिंचवड शहरातील थेरगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत काही तासांत त्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, थेरगाव परिसरातील शिवशंकर कॉलनी येथील श्रीकृष्ण दूध डेरीसमोर तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. सुभान शेख (१९ वर्षे) या तरुणाची चाकू आणि चॉपरने सपासप वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृत तरुण सुभान याचा भाऊ देखील गंभीर जखमी झाला आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून ही घटना घडली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच, काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत सुभान शेखच्या दोन्ही मारेकऱ्यांना तातडीने अटक केली. ७ मेच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास सुभान शेख आणि त्याचा भाऊ अर्शद शेख हे शिवशंकर कॉलनी भागातून जात होते. यावेळी आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी त्यांना अडवले. सुभानचे सपना नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते थांबवण्यावरून त्यांच्यात वाद झाला. सुभानने याला विरोध केल्याने संतापलेल्या आरोपींनी चाकू, चॉपर आणि लाकडी दांडक्याने सुभानवर हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुभानचा जागीच मृत्यू झाला. तर अर्शद गंभीर जखमी झाला. मात्र पोलिस तपासात या गुन्ह्याचे एक वेगळेच वळण समोर आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशीचे जयश्री नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. धक्कादायक बाब म्हणजे, मृत सुभान शेखचे जयश्रीची मुलगी सपनासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे जयश्रीने विशाल सूर्यवंशीला सुभान शेख सपनासोबत प्रेमसंबंध तोड असे समजवायला पाठवले होते. मात्र विशाल सूर्यवंशी हा सुभान शेखला समजवून सांगत असताना वाद विकोपाला गेल्याने सुभान शेखची हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या ८ तासांत आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.