Pune Court News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Court News: लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषीला या जिल्ह्यात सुनावली आहे फाशीची शिक्षा; ७ वर्षांच्या मूलीवर केला होता अत्याचार

Pune News: 2 ऑगस्ट 2022 रोजी मावळातील पवनानगरच्या कोथूर्ण येथील ७ वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आला होती. यातील आरोपीला पुणे शिवाजीनगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Sandeep Gawade

बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणावरून जनक्षोभ उसळल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक घटना समोर येत आहेत. अशा घटनांमधील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशी दिल्याचा दावा केला होता. विरोधकांनी हा दावा खोडून काढला होता. मात्र मावळात अशीच एक घटना घडली होती. यातील आरोपीला २०२४ मध्ये फाशीची शिक्षा न्यायालायने सुनावली आहे. मात्र ही घटना २०२२ मध्ये घडली होती आणि दोन वर्षांनी न्यायालयाने त्यावर निकाल दिला होता.

दोन वर्षांपूर्वी मावळातील पवनानगरच्या कोथूर्ण येथील ७ वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आला होता. अत्याचारानंतर पीडित मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. ही घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती, या प्रकरणाची अंतिम सुनावणी पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्याच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली होती. तेजस दळवी याच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीला १०००० रुपये दंड आणि त्याच्या आईला ५००० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. राजेश कावेडीया यांनी सरकारी वकील म्हणून या प्रकरणाचं काम पाहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT