Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच ; शरद पवार गटातील या नेत्याच्या नावाची चर्चा

MVA CM Candidate/ Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना महाविकास आघाडीत आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Saam Tv
Published On

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं राज्यातील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला असून महाराष्ट्रातील पक्षसंघर्षानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेंच सुरू असतानाच आता मुख्यमंत्रि‍पदावरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Aditya Thackeray Convoy Accident: नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात, दुचाकीस्वाराने दिली धडक

विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची घेतल्याची सूत्राची माहिती आहे. ज्याच्या सर्वाधिक जागा, त्याचा मुख्यमंत्री, हे सूत्र मान्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच एका सभेत म्हटलं आहे. यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.

१६ तारखेच्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने ठोस उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Politics : दोन महिन्यात आरोपीला फाशी झाली, CM एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर विरोधक काय काय म्हणाले? VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचा चेहरा उद्धव ठाकरेचं असण्याची शक्यता आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते मुख्यमंत्रीही होते. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा राष्ट्रवादीचाच असेल असा प्रचार सुरू केला आहे. तसंच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेतील असंही म्हटलं आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटला तरी विधानसभेत बहुमत मिळालं तर मुख्यमंत्रि‍पदाचा पेच असणार आहे.

राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी संतोष पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जयंत कुसुम राजाराम पाटील हेच आहेत आणि शपथ देखील जयंत पाटीलच घेणार आहेत, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Politics : ...तरीही तुमच्या विरोधात निवडणूक लढणारच! घाटगेंचा मुश्रीफांना इशारा, भाजप नेते मनधरणीसाठी बंगल्यावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com