दोन महिन्यात आरोपीला फाशी झाली, CM एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर विरोधक काय काय म्हणाले? VIDEO
Maharashtra Politics Saam tv

Maharashtra Politics : दोन महिन्यात आरोपीला फाशी झाली, CM एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर विरोधक काय काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Political news : मुख्यमंत्र्यांच्या एका दाव्यावरून राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. तसेच अनेक सवाल उपस्थित केले आहे.
Published on

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या अत्याचार प्रकरणावरून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अत्याचार प्रकरणावरून विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्यात येत आहे. या आरोप-प्रत्यारोपादरम्यान, अशीच एक अत्याचाराची घटना घडली होती. त्यावेळ फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्याववरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचे म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील एका कार्यक्रमात तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीसोबत अशीच एक अत्याचाराची घटना घडली. त्यावेळी फास्ट कोर्टात हे प्रकरण चालवण्यात आलं. त्यावेळी दोन महिन्यात आरोपीला फाशी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचं टीकास्त्र

संजय राऊत म्हणाले, 'बदलापूर आंदोलनात लोक रस्त्यावर उतरले होते. हा जादूटोणा नाही. पोलीस या प्रकरणाची तक्रार घेत नव्हते. यात विरोधकांचा काय दोष? मुख्यमंत्र्यांची क्लिप व्हायरल झाली आहे. ते आरोपीला शिक्षा दिल्याचे सांगतात. कुठे फाशीची शिक्षा दिली. ते त्यांनी सांगावी. फाशीची शिक्षेची राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांनी याची चौकशी करावी. मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारटे आहेत. देवेंद्र फडणवीसही तसेच आहेत'.

अरविंद सावंत म्हणाले?

बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. अरविंद सावंत म्हणाले, 'खोटं कसं बोलावे हे यांच्याकडून शिकावं. हे खोटारडे, भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार दिसत आहे. सरकारचे प्रमुख धांदात खोटं बोलत आहेत. दोन महिन्यात कोणाला फाशी दिली हे त्यांनी सांगावं. देशाला कळूद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती खोटं बोलत आहे. तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतो आणि हे काही लोकांना पाठीशी घालत आहेत'.

दोन महिन्यात आरोपीला फाशी झाली, CM एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर विरोधक काय काय म्हणाले? VIDEO
Nagpur Crime News : भयंकर! नागपुरात ८ वर्षीय मुलीचा विनयभंग

विजय वडेट्टीवरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना विजय वडेट्टीवर म्हणाले, 'मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवतात. बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिल्याचं भर सभेत धडधडीत खोट बोलतात. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की, महायुती सरकारच्या काळात २ महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? हे सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर करावे'.

दोन महिन्यात आरोपीला फाशी झाली, CM एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर विरोधक काय काय म्हणाले? VIDEO
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपाआधीच रस्सीखेच सुरू; नागपुरातील ६ जागांवर ठाकरे गटाचा दावा, कॉंग्रेस आक्रमक

'सरकार आल्यावर फक्त फक्त SIT ची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री महोदय ,बलात्कार सारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय तरी घेऊन नका, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com