पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर
राज्यात सर्वच राजकीय पक्षांना सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत कोणती जागा, कोणाला द्यायची? यावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. जागावाटपावरून आता ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये देखील जुंपल्याचं चित्र (Thackeray group vs congress) आहे. नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरून चांगलीच रस्सीखेच होत असल्याचं समोर आलंय.
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच उपराजधानी नागपुरामध्ये देखील सुरू आहे. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी नागपूर दौऱ्यात दावा केला ( nagpur seat sharing crisis) होता. त्यानंतर आता नागपूर शहरातील सहाच्या सहा जागा पारंपरिक काँग्रेसच्याच असल्याचं शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले आहेत.
ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये जुंपली
महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी नागपूर महानगरपालिका हद्दीत दक्षिण नागपूरच्या दृष्टीने एका रोजगार मेळाव्यात सुद्धा संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. मात्र, काँग्रेसने मागील वेळेस ४ हजार मतांनी गमावलेली ही जागा नैसर्गिकरीत्या आमच्याकडेच राहायला हवी, अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे आता या जागेवरून महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्हं (vidhan sabha election) आहेत.
महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू
आता नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जागा महाविकास आघाडीतील कोणत्या घटकपक्षाला मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकतंच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून देखील महाविकास आघाडीत वादळ उठल्याचं पाहायला मिळालं (Mahavikas aghadi) होतं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री २.० असतील, असं पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं होतं. परंतु यानंतर मात्र कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. त्यामुळे नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.