Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाला घाटगेंची दांडी; कागलमध्ये मुश्रीफ -घाटगे लढत अटळ?

Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge : कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला भाजपच्या समरजितसिंह घाटगे यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे यांच्यात लढत निश्चित मानली जात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Saam Digital
Published On

भाजपचे कागलमधील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधासभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. शरद पवार गटातून निवडणूक लढण्याच्या चर्चा असताना काल खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. आज कोल्हापुरात होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष होतं. मात्र घाटगेंनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच ; शरद पवार गटातील या नेत्याच्या नावाची चर्चा

कोल्हापुरात आज महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. समरजितसिंह घाटगे कोल्हापुरातील भाजपचे मोठे नेते शिवाय देवेंद्र फडणवीस यांचे निकडवर्तीय मानले जातात. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा होती.

हसन मुश्रीफ कागलमधून विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांना महायुतीतून डावलता येणार नाही. मात्र मुश्रीफ पाच वेळा कागलमधून निवडून आले आहेत. आता आपल्याला संधी द्यावी अशी घाटगेंची मागणी आहे. मात्र याबाबत पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. उलट त्यांच्या मनधरणी करण्यात येत आहे. त्यामुळे ते शरद पवार गटासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडीक आणि कोल्हापुरातील भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपाआधीच रस्सीखेच सुरू; नागपुरातील ६ जागांवर ठाकरे गटाचा दावा, कॉंग्रेस आक्रमक

यावेळी धनंजय महाडीक यांनी घाटगे महायुतीसोबतच असतील असं माध्यमांना सांगितलं होतं. तसंच घाटगे आज होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असंही म्हटलं होतं. मात्र समरजितसिंह घाटगे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ -घाटगे लढत अटळ निश्चित मानली जात आहे.तसंच कागलमध्ये होणाऱ्या मेळाव्यात ते आपली भूमिका स्पष्ट करतील, त्याच दिवशी शरद पवार गटाचाही मेळावा कागलमध्ये आहे. त्यामुळे राज्याचं लक्ष या मेळाव्याकडे असणार आहे. दरम्यान घाटगे यांच्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील महत्त्वाच्या मतदारसंघात महायुतीची मात्र कोंडी झाली आहे.

Maharashtra Politics
Badlapur Case: 'बदलापूरचे आंदोलन राजकीय स्टंट, विरोधकांनी CM शिंदेंचा दावा खोडला, संजय राऊत, वडेट्टीवारांनी थेट पुरावे दाखवले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com