Is Breathlessness A Sign Of Heart Disease
Is Breathlessness A Sign Of Heart Diseasesaam tv

Warning signs of serious diseases: ही ७ प्रकारची दुखणी अंगावर काढू नका, अन्यथा...

Body pain symptoms: डोकेदुखी, छातीत वेदना, पोटदुखी किंवा अंगदुखी यांसारख्या काही वेदनांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. शरीर देत असलेलं हे इशारे ओळखा.
Published on

हलकी डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवली की लगेच आराम मिळावा म्हणून अनेकजण पेनकिलरचा वापर करतात. बहुतेक लोक असंच करतात. याचं कारण म्हणजे प्रत्येक छोट्या त्रासासाठी डॉक्टरांकडे जाणं नेहमी शक्य होत नाही किंवा लोक डॉक्टरकडे जाण्याचा कंटाळा करतात. एखादी वेदना सतत होत राहिली आणि काही केल्या कमी झाली नाही तर तो तुमच्या शरीराकडून दिला जाणारा एक इशारा असू शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत योग्य तपासणी आणि डॉक्टरांचं निदान अत्यंत गरजेचं असतं. कारण त्यातूनच त्या त्रासामागचं खरं कारण समजण्यास मदत होते. त्यामुळे काही प्रकारच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये. कोणत्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये ते पाहूयात.

Is Breathlessness A Sign Of Heart Disease
Mobile Addiction: जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी दिला ईशारा

तीव्र डोकेदुखी

डोकेदुखी होण्यामागे अनेक सामान्य कारणं असू शकतात. जसं की, शरीरात पाण्याची कमतरता, ताणतणाव, सायनसची समस्या. परंतु औषध घेतल्यानंतर किंवा घरगुती उपाय केल्यानंतरही डोकेदुखी कायम राहिली तर ती मायग्रेनसारख्या समस्येचं किंवा मेंदूमध्ये रक्तस्रावासारख्या गंभीर स्थितीचं लक्षण असू शकते.

पायात होणारी वेदना

पायात सतत वेदना होणं किंवा दुखणं हे डायबेटिक न्युरोपॅथीशी संबंधित असू शकतं. यासोबत त्वचा कोरडी किंवा खाज येणं, जास्त तहान लागणं, जखम हळूहळू भरणं, दृष्टी धूसर होणं आणि वारंवार लघवी होणं अशी इतर लक्षणंही दिसू शकतात. त्यामुळे ही वेदना मधुमेहाशी संबंधित आहे का किंवा फक्त साधा स्नायूंचा त्रास आहे का, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

तीव्र पाठदुखी

पाठदुखी हा खूप सामान्य त्रास आहे. चुकीची बसण्याची पद्धत, बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहणं यामुळे हा त्रास होऊ शकतो. परंतु ही वेदना जास्त काळ राहिली आणि काही केल्या कमी झाली नाही तर ती एखाद्या गंभीर आजाराचं लक्षणं असू शकते. जसं की, रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या किंवा इतर काही गंभीर आरोग्याच्या समस्या.

Is Breathlessness A Sign Of Heart Disease
Kidney health: केवळ लाईफस्टाईल नाही तर ही औषधं तुमची किडनी करतायत खराब, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

पोटऱ्यांमधील वेदना

पोटरीत गोळा येणं किंवा क्रॅम्प येणं हे खूप वेदनादायक असतं. पण सामान्यपणे हा त्रास काही वेळाने आपोआप कमी होतो. मात्र पोटरीला बराच काळ सूज असेल, वेदना होत असतील तर ते डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) चं लक्षण असू शकतं. या स्थितीत रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

Is Breathlessness A Sign Of Heart Disease
Boby Detox Drink: शरिराला डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी प्या 'हे' स्पेशल ड्रिंक, ब्लोटिंग आणि पचन सुधारते

अंगदुखी

जर तुम्हाला वारंवार अंगदुखी होत असेल आणि त्यामागे कोणतेही कारणं दिसत नसतील तर त्या वेदना सामान्य नाहीत. काही वेळा अशा प्रकारची सततची वेदना नैराश्य (डिप्रेशन) यांसारख्या मानसिक समस्यांशी संबंधित असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.

तीव्र पोटदुखी

हलकी पोटदुखी अनेकदा अपचन किंवा गॅसमुळे होऊ शकते. पण जर ही वेदना खूप तीव्र असेल, सतत होत राहिली आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागली तर ती पित्ताशयाशी संबंधित समस्या, स्वादुपिंडाची समस्या किंवा अल्सरसारख्या गंभीर आजारांशी संबंधित असू शकतं.

छातीत होणाऱ्या वेदना

छातीत होणाऱ्या वेदनांमागे अनेक कारणं असू शकतात. जसं की, अॅसिडिटी, स्नायूंचा ताण किंवा हृदयाशी संबंधित समस्या. परंतु जर छातीत तीव्र वेदना जाणवत असतील आणि ती जबडा, घसा, पोट किंवा हातापर्यंत पसरत असेल तर ते हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे.

Is Breathlessness A Sign Of Heart Disease
Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com