Shruti Vilas Kadam
जर तुम्ही दररोज पाण्यात लिंबू आणि लवंग उकळले, ते गाळले आणि नंतर प्यायले तर त्याचे शरीरावर फायदेशीर परिणाम दिसून येतात.
लवंगातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्म पोटातील हानिकारक जीवाणू व कीड कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
हे हर्बल ड्रिंक शरीरातील दाह कमी करते, ज्यामुळे पिंपल्स, सूज आणि त्वचेच्या समस्या आटोक्यात येण्यास मदत होते.
लिंबू-लवंग चहा पचन सुधारतो आणि गॅस, पोट फुगणे यांसारख्या तक्रारींमध्ये आराम देतो.
नियमित सेवनामुळे अन्नाचे पचन चांगले होते, पोषक घटकांचे शोषण वाढते आणि अॅसिडिटी-हार्टबर्नपासून दिलासा मिळतो.
लिंबू व लवंगातील अँटी-इंफ्लामेटरी व अँटी-मायक्रोबियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि हंगामी आजारांपासून संरक्षण देतात.
हा हर्बल चहा शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे देतो, त्यामुळे थकवा कमी होऊन दिवसभर ऊर्जा टिकते.
पचन व मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे अनावश्यक भूक कमी होते आणि चरबी घटण्यास हातभार लागतो