Shruti Vilas Kadam
ताज्या गुलाबाच्या पाखळ्या स्वच्छ पाण्यात २–३ वेळा नीट धुवा. त्यावरील धूळ, मळ आणि कीटकनाशकांचे अवशेष पूर्णपणे काढून टाका.
धुतलेल्या पाखळ्यांमध्ये थोडेसे पाणी घालून मंद आचेवर हलके उकळा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करून गाळणीने गाळून गुलाबाचा अर्क वेगळा ठेवा.
डबल बॉयलर पद्धतीने (गरम पाण्यावर दुसरे भांडे ठेवून) शीया बटर हळूहळू वितळवा. थेट गॅसवर ठेवू नका.
वितळलेल्या शीया बटरमध्ये आल्मंड ऑयल आणि एलोवेरा जेल घालून नीट एकजीव होईपर्यंत मिसळा. यामुळे त्वचेला पोषण व हायड्रेशन मिळते.
आता या मिश्रणात गुलाबाचा अर्क, विटामिन E तेल आणि ग्लिसरीन घालून चांगले फेटा, जेणेकरून क्रीम स्मूथ बनेल.
मिश्रण क्रीमी टेक्सचरचे झाल्यावर ते स्वच्छ, कोरड्या काचेच्या जारमध्ये भरा आणि थंड ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवा.
रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. थोडीशी क्रीम चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि तसेच ठेवून झोपा.