Shruti Vilas Kadam
जांभळ्या साडीवर सोनेरी रंगाचा ब्लाऊज खूपच रॉयल आणि एलिगंट दिसतो. लग्नसमारंभ आणि सणांसाठी हा कॉम्बिनेशन परफेक्ट ठरतो.
जांभळ्या साडीवर पिवळा किंवा मस्टर्ड रंगाचा ब्लाऊज घातल्यास लुक फ्रेश आणि ट्रेंडी दिसतो. डे फंक्शन्ससाठी हा उत्तम पर्याय आहे.
डार्क पर्पल साडीवर बॉटल ग्रीन ब्लाऊज अतिशय क्लासिक आणि आकर्षक दिसतो. सिल्क आणि बनारसी साडीसोबत हा कॉम्बो खास उठून दिसतो.
हलका आणि सॉफ्ट लुक हवा असेल तर क्रीम किंवा ऑफ-व्हाइट ब्लाऊज उत्तम पर्याय आहे. हा कॉम्बिनेशन साध्या तसेच पार्टी वेअर साडीसाठी शोभतो.
पर्पल साडीवर पिंक किंवा मॅजेंटा ब्लाऊज घातल्यास लुक अधिक फेमिनिन आणि ग्लॅमरस दिसतो. रिसेप्शन किंवा पार्टीसाठी हा ट्रेंडी पर्याय आहे.
जांभळ्या साडीवर ब्लॅक ब्लाऊज नेहमीच स्टायलिश आणि सेफ चॉईस मानला जातो. मॉडर्न आणि बोल्ड लुकसाठी हा उत्तम कॉम्बो आहे.
साध्या पर्पल साडीवर प्रिंटेड किंवा एम्ब्रॉईडरी असलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातल्यास साडीचा लुक अधिक उठून दिसतो.