

किडनी ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तज्ञांच्या मते, किडनी योग्य पद्धतीने काम करत नसल्यास शरीरातील pH संतुलन राखणं, रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, ग्लुकोज तयार करणं आणि इतर अनेक आवश्यक कार्य करणं अशक्य होतं. The Lancet मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार भारतातील सुमारे १३८ दशलक्ष लोक किडनीच्या आजाराने (Chronic Kidney Disease – CKD) त्रस्त असल्याची माहिती आहे.
The Centres for Disease Control and Prevention (CDC) यांच्या मते, “CKD ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये किडनी खराब होतात आणि त्या रक्त पूर्वीप्रमाणे फिल्टर करून शकत नाहीत. त्यामुळे शरीरात अतिरिक्त द्रव पदार्थ साचून राहतात. त्यामुळे हृदयविकारासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
National Institute of Health (NIH) च्या २०१८ ते २०२३ यावेळी कालावधीत केलेल्या अभ्यासानुसार CKD ची प्रकरणं ११.२ टक्क्यांवरून १६.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. या वाढीमागे औषधांमुळे होणारं नुकसान हेही एक महत्त्वाचं कारण असल्याचं समोर आलंय. काही औषधं जी आपण बरं होण्यासाठी घेतो ती तीच आपल्या किडन्यांना हानी पोहोचवू शकतात. यामध्ये कोणत्या औषधांचा समावेश आहे ते पाहूयात.
NIH च्या माहितीनुसार, आयब्यूप्रोफेन, नेप्रोक्सेन, डायक्लोफेनॅक यांसारखी पेनकिलर औषधं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ही औषधं वेदना कमी करण्यास मदत करतात. परंतु यामुळे किडनीतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. अशावेळी आवश्यक असलेल्या ‘प्रोस्टाग्लँडिन’ याच्या निर्मितीला अडथळा आणतात. प्रोस्टाग्लँडिनचं प्रमाण कमी झालं तर किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो.
अमिनोग्लायकोसाइड ही अँटिबायोटिक्सची एक श्रेणी आहे. ज्यामध्ये जेंटामायसिन, टोब्रॅमायसिन आणि अमिकॅसिन यांसारखी औषधं येतात. ही औषधं गंभीर बॅक्टेरियाच्या संसर्गांवर उपचार करण्यासाठी दिली जातात. तज्ञांच्या मते, ही औषधं किडनीतील ट्युब्युल पेशींमध्ये साचू शकतात. दीर्घकाळात या साचलेल्या औषधांमुळे ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात जे पेशींना हानी पोहोचवतात.
व्हॅन्कोमायसिन हे बॅक्टेरियावर उपचार करण्यासाठी वापरलं जाणारं एक प्रभावी अँटिबायोटिक आहे. संशोधनानुसार, हे औषध सर्वसाधारणपणे सुरक्षित मानलं जात असलं तरी ते किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. या औषधाचा हाय डोस किंवा अमिनोग्लाय कोसाइडसारख्या इतर औषधांसोबत घेतल्यास किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
CT स्कॅन किंवा अँजिओग्राफीसारख्या तपासण्यांमध्ये वापरले जाणारे कॉन्ट्रास्ट काही वेळा ‘कॉन्ट्रास्ट-इंड्यूस्ड नेफ्रोपॅथी’ निर्माण करू शकतात. हे पदार्थ विशेषतः धोकादायक ठरतात कारण ते किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी करू शकतात. ज्यांना किडनीच्या अगोदरच काही समस्या असतील त्यांनी अशा तपासण्यांपूर्वी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.