Urinary symptoms: लघवीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष महागात पडू शकते; किडनी आणि हृदयाच्या समस्यांची असू शकते सुरुवात

Is Frequent Urination a Sign of Diabetes: वारंवार लघवी होणं, जळजळ, लघवीत रक्त येणं किंवा इतर बदल हे गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. युरीन इन्फेक्शन, किडनी, प्रोस्टेट, डायबेटीज आणि हृदयाच्या समस्यांचे संकेत ओळखून वेळेवर तपासणी करणं आवश्यक आहे.
Urinary symptoms
Urinary symptomsSAAM TV
Published On

वारंवार लघवी होणं, जळजळ, लघवीत रक्त येणं किंवा इतर बदल ही गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. युरीन इन्फेक्शन, किडनी, प्रोस्टेट, डायबेटीज आणि हृदयाच्या समस्यांचे संकेत ओळखून वेळेवर तपासणी करणं आवश्यक आहे.

काही समस्यांची लक्षणं ही तुम्हाला लघवीमध्ये दिसतात असं म्हटलं जातं. मात्र लोकं याकडे सामान्य समस्या म्हणून सोडून देतात. सतत लघवी होणं, लघवी करताना जळजळ होणं किंवा लघवीमध्ये इतर बदल दिसून येणं या लक्षणांकडे सातत्याने दुर्लक्ष करू नये. हे अनेक गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Urinary symptoms
Heart Attack: झोपेतून उठताच थकवा जाणवतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. यामुळे निदान आणि उपचार करण्यास उशीर होऊ शकतो.

मनीकंट्रोल बेवसाईटला माहिती देताना डॉ. माधव संजगिरी यांनी सांगितलं की, लवकर ओळख पटवणं आणि वेळेवर उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आधुनिक निदान आणि उपचार पद्धतींमुळे अनेक युरोलॉजीकल आजारांवर त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात नियंत्रण ठेवता येतं.

साध्या दिसणाऱ्या युरीनरी इफेक्शन जर त्वरित उपचार केले नाहीत तर ते युरीनरी ट्रॅकमधून किडनीत पसरू शकते. यामुळे किडनीची गंभीर संसर्ग होऊ शकतो. अगदी सेप्सिस सारखी जीवघेणी स्थिती देखील होऊ शकते.

Urinary symptoms
Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

याची लक्षणं काय दिसून येतात?

कधीकधी किडनीचे आजार स्पष्ट लक्षणांशिवाय दीर्घकाळ शरीरात वाढत राहतात. लघवी कमी होणं किंवा लघवीतून रक्त येणं ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात. पुरुषांमध्ये लघवीदरम्यानन त्रास होणं, कमी प्रमाणात लघवी होणं किंवा रात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठणं हे प्रोस्टेटच्या समस्येचं लक्षण असू शकतं. परंतु कधीकधी ते इन्फेक्शन किंवा कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

महिलांमध्ये काय दिसून येतात लक्षणं?

महिलांमध्ये लघवीबाबत कंट्रोल नसणं किंवा अचानक लघवी करण्याची इच्छा होणं हे बहुतेकदा वाढत्या वयाशी संबंधित असतं. परंतु ते किडनीच्या कार्याचं किंवा मज्जातंतूंच्या समस्यांचे परिणाम देखील असू शकतात. जर याकडे दुर्लक्ष केलं तर ते दैनंदिन जीवन, झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतं. लघवीदरम्यान वेदना होणं किंवा लघवीमध्ये रक्त येणं यासारखी लक्षणं दिसली तर किडनी स्टोनचा त्रास असू शकतो.

Urinary symptoms
Sleep Disorder: झोपमोड होते अन् रात्री सतत जाग येतेय? असू शकतो या जीवघेण्या आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध

हृदयाच्या समस्यांचंही लक्षणं

रात्री वारंवार लघवी होणं हे डायबेटीज किंवा हार्टच्या समस्यांचं लक्षण असू शकतं. जेव्हा तुमच्या रक्तातील साखर वाढते तेव्हा किडनीला जास्त काम करावं लागतं. ज्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, लघवीबाबत दिसून येणारी लक्षणं हलक्यात घेऊ नयेत.

Urinary symptoms
Thyroid Disease Symptoms: अचानक जास्त थंडी वाजतेय? सावध व्हा, थायरॉईडच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com