सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Corporator Mrunal Kamble brother assault case in Pune : महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर कोण होणार? याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहे. राज्यात एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडला असतानाच पुण्यात मात्र वेगळेच चित्र आहे. भाजप नगरसेविकेच्या भावाला भाजप कार्यकर्त्यांनीच बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बॅनर लावल्यानंतर दोन गटात जोरदार राडा झाला होता. त्यामध्ये नगरसेविकेच्या भावाला बेदम मारहाण झाल्याचे बोलले जातेय. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. हल्ला झाला, त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ला करण्यांविरोधात ठोस कारवाई केली जाईल, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील नगरसेविका मृणाल कांबळे यांचा भाऊ शंतनू कांबळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याचं तक्रारीत म्हटले आहे. शंतनू कांबळे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. बॅनर लावण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे मारहाण केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कांबळे यांच्या तक्रारीनंतर १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांना बेदम मारहाण करणारे भाजपच्याच नगरसेविका अर्चना पाटील यांचे कार्यकर्ते होते अशी माहिती पोलिसांत देण्यात आली आहे. नगरसेविका मृणाल कांबळे यांचा भाऊ शंतनू कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तुषार पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा, अशी मागणी बापू कांबळे यांनी केली आहे. माझी मुलगी मागासवर्गीय असल्याने तिला तुषार पाटील त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जयंतीनमित्त कार्यक्रम असल्याने मंदिराच्या समोर आरोपी बॅनर लावत होते. या बॅनरमुळे वाहतूकीस अडथळा होईल, म्हणून सतीश साठे यांनी मंदिरासमोर बॅनर लावण्यास विरोध केला. आरोपी यांनी त्याचा राग मनात धरुन सतीश साठे व युवराज अडसुळ यांना शिवीगाळ केली. बॅनर बांधण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी हत्यार, लाकडी बांबु व लोखंडी पाईप यांनी मारहाण करुन जखमी केले. अशी फिर्याद तुषार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.
त्याविरोधात नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनु पांडुरंग ऊर्फ बापू कांबळे (वय ३०, रा. एस आर ए बिल्डिंग, लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी युवराज अडसूळ, अक्षय अडसूळ, सतीश साठे, विक्रम खेनट (सर्व रा. काशेवाडी), प्रविण फैजी, राहुल मोहिते (रा. लोहियानगर) व इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काशेवाडी येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे शेजारी तुषार पाटील यांचे पाटील चौक येथे २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.