

अखेर टीम इंडियाने कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टी-२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या टीमचा दारूण पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे.
कर्णधार सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा इतिहास रचलाय. यावेळी टीम इंडियाला केवळ ट्रॉफीच मिळाली नाही तर खेळाडूंवर पैशांचाही वर्षाव झाला आहे. आयसीसीने या टूर्नामेंटसाठी $१३.५ दशलक्ष किंवा म्हणजे अंदाजे ₹१२० कोटींचं प्राइज पूल ठेवलं होतं. ही रक्कम गेल्या स्पर्धेपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी जास्त आहे.
२०२६ चा टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाला ३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे २७.५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली जाईल आणि नंतर बोनस, सामना शुल्क आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात खेळाडूंमध्ये त्याचं वाटप करण्यात येणार आहे.
या सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या टीमचा पराभव केला. मात्र फायनल सामना गमावल्यानंतरही न्यूझीलंडचा प्राईज मनीमध्ये मोठी रक्कम मिळालीये. न्यूझीलंडला $१.६ दशलक्ष किंवा अंदाजे ₹१४.७ कोटी रक्कम देण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही चांगले पैसे मिळणार आहेत. दोन्ही टीम्सना $७९०,००० म्हणजेच अंदाजे ७.२४ कोटी रुपये बक्षीस देण्यात आलंय.
स्पर्धेच्या सुपर ८ टप्प्यात पोहोचलेल्या टीम्सनाही प्राईज मनी मिळालं. झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना ३८०,००० डॉलर्स म्हणजे अंदाजे ३४.८ दशलक्ष रुपये बक्षिस देण्यात आलं.
सर्व २० टीम्सना प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या टीम्सना बक्षीस देखील दिलंय. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि युनायटेड स्टेट्स यांना $२५०,००० म्हणजे अंदाजे ₹२३ दशलक्ष मिळालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.