

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
Political violence during Zilla Parishad elections in Sambhajinagar : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. तिकिट वाटपावरून भाजप नेत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना औराळामध्ये घडली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, माजी जि.प. सदस्य सुरेश गुजराणे यांच्या कार्यालयात उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. (BJP leader attack Maharashtra)
यावेळी औराळा येथील अंबादास खवळे आणि रामदास खवळे यांनी पंचायत समितीच्या तिकीट वाटपावरून सुभाष काळे यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काळे वाहनाकडे जात असतानाच दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कन्नड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या चिंचखेडा (खुर्द) येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष भागीनाथ काळे यांच्यावर औराळा येथे काही लोकांनी जीवघेणा हल्ला करत धारदार लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सुभाष काळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, विलास भोजणे यांच्यासह भाजपचे गट-गणाचे उमेदवार हे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे यांच्या पेट्रोल पंपावरील कार्यालयात चर्चा करण्यासाठी गेले होते.
चर्चा सुरू असताना औराळा येथील गावगुंड अंबादास तातेराव खवळे व रामदास तातेराव खवळे हे दोघे तेथे आले. पंचायत समितीच्या तिकीट वाटपावरून त्यांनी सुभाष काळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिकीट देणे अथवा न देणे हे त्यांच्या हातात नसल्याचे सांगत उपस्थितांनी शिवीगाळ करू नये, असे समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच सुभाष काळे यांना वाहनात बसून निघून जाण्यास सांगण्यात आले. ते वाहनाकडे जात असतानाच अंबादास खवळे व रामदास खवळे या दोघांनी लोखंडी रॉडने सुभाष काळे यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुभाष काळे यांच्यावर सध्या कन्नड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.