Pune Traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुठा नदीवरील पूल कायमचा बंद, पानशेत पुलाबाबतही मोठा निर्णय; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic News Today : मुठा नदीवरील पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला असून 68 वर्षे जुना पानशेत पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने जाहीर केलेले पर्यायी मार्ग आणि संपूर्ण माहिती वाचा.

Namdeo Kumbhar

Pune Infrastructure Update: पुणेकरहो, घराबाहेर पडण्यापूर्वी ही अत्यंत महत्त्वाची बातमी नक्की वाचा! हवेली आणि राजगड तालुक्यातील दोन मोठे आणि महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील पूल आता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे, तर राजगड तालुक्यातील ६८ वर्षे जुना पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक झाल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तातडीने बंद करण्यात आला आहे.

आगामी मान्सून आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला असून, लवासा, वरसगाव आणि पानशेत परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना आता प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. जाणून घ्या दोन्ही पुलांबाबत नेमका काय निर्णय झालाय आणि पर्यायी मार्ग कोणते आहेत..

मुठा नदीवरील पूल कायमचा बंद

हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील (ग्रामा-४५ कि. तर. 1/000) मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी जारी केले आहेत. वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे कातवडीकडून डावजे–कुरणकडे जाणारी वाहतूक कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण–डावजे बाजूकडून कातवडीकडे येणारी वाहतूक कुरण–जांभळी–डावजे - कोंढूर–बहुली–कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

पानशेत वसाहतीजवळील पूल ६८ वर्षांनंतर बंद

राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील १४/०४५ येथे पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत बंद करण्यात आल असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केले आहेत.

पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना व जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लवासा, वरसगाव व आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुणेकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर मार्गे वळविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT