Amitabh Bachchan: मुंबईत खळबळ! बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी

Amitabh Bachchan: मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाला आहे. या मेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा बंगलाही टार्गेटवर असल्याचे समजले आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam Tv
Published On: 

Amitabh Bachchan: मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे कार्यालय तसेच माझगाव, दिंडोशी आणि एस्प्लनेड येथील न्यायालयांमध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचे ई-मेल आले होते.या घटनेनंतर मुंबई पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ई-मेलमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही जलसा या बंगल्याला टार्गेट करण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगल्याला टार्गेट

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला आहे. या मेलमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. धमकीचा ई-मेल मिळताच संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.यामध्ये बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), वरळी रेसकोर्स आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' बंगल्याचा समावेश आहे.

Amitabh Bachchan
Ramayana Movie Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! पहिल्याच दिवशी छफरफाड कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरू

धमकी मिळाल्यानंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून न्यायालय परिसरात तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसराची पाहणी केली जात असून, धमकीच्या ई-मेलचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हा ई-मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवला, याचाही तपास केला जात आहे.

Amitabh Bachchan
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन; हृदयाच्या गंभीर आजारासोबतची झुंज अपयशी

काही दिवसांपूर्वीही मिळाल्या होत्या धमक्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील महापालिकेच्या कार्यालयासह माझगाव, दिंडोशी आणि एस्प्लनेड येथील न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल आले होते. या धमक्यांनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी तपासणी केली होती. आता आठवडाभरातचं पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाला धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.