Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन; हृदयाच्या गंभीर आजारासोबतची झुंज अपयशी

Actress Death: 'बेव्हर्ली हिल्स, ९०२१०' फेम अभिनेत्री किमरी जॉन्सन यांचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन झाले. हृदयाशी संबंधित त्रासानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी जाणून घ्या.
hollywood actress Kim Marie Johnson passes away
hollywood actress Kim Marie Johnson passes awaySaam tv
Published On: 

Actress Death: हॉलिवूड मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल किमरी जॉन्सन (Kimmarie Johnson) यांचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन झाले आहे. 'बेव्हर्ली हिल्स, ९०२१०' (Beverly Hills, 90210) या लोकप्रिय मालिकेमुळे त्या विशेष चर्चेत आल्या होत्या. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांसह मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयाशी संबंधित आजार

'द इंडिपेंडंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, किमरी जॉन्सन यांना २७ ऑक्टोबर रोजी हार्ट अटॅक आला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना लॉस एंजेलिसमधील सेडर्स-सिनाई रुग्णालयात (Cedars-Sinai Hospital) नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयाशी संबंधित 'अ‍ॅन्युरिझम'ची समस्या असल्याचे निदान झाले. त्यांच्या भाची रोंडा स्कॉट हिने 'टीएमझेड'ला दिलेल्या माहितीनुसार, या आजारामुळे ४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

hollywood actress Kim Marie Johnson passes away
Rmayana Review: 'रामायण' थिएटरमध्ये का पाहावा? रणबीर कपूरचा अभिनय, यशचा रुबाब आणि चित्रपटातील 'या' खास गोष्टी जाणून घ्या

'बेव्हर्ली हिल्स, ९०२१०'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण

किमरी जॉन्सन यांनी १९९८ मध्ये लोकप्रिय टीव्ही मालिका 'बेव्हर्ली हिल्स ९०२१०'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेच्या एका भागात त्यांनी ज्युडी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर २००० मध्ये त्या पामेला अँडरसनसोबत 'V.I.P.' या मालिकेतही झळकल्या होत्या. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत 'Dude, Where's My Car?', 'Shadow Fury', 'Spanish Fly', 'Wanda at Large', 'Gang Warz' आणि 'The Summer of Massacre' यांसारख्या चित्रपट आणि मालिकांचा समावेश आहे. २०१७ मध्ये 'Tucker's War' या मालिकेच्या एका भागात त्या शेवटच्या दिसल्या होत्या.

hollywood actress Kim Marie Johnson passes away
Jai Shree Ram Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? प्रविण तरडेंच्या 'जय श्री राम'मधून उलगडणार कहाणी

अभिनयासोबत मॉडेलिंग आणि व्यवसायातही ठसा

किमरी जॉन्सन केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर त्या एक यशस्वी मॉडेलही होत्या. १९९३ मध्ये त्यांनी 'मिस पेनसिल्व्हेनिया यूएसए'चा किताब पटकावला होता. त्यानंतर 'मिस यूएसए' स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. २०११ मध्ये त्यांनी 'SkinGlow by Kimmarie' हा स्वतःचा स्किनकेअर ब्रँड सुरू केला होता. निधनापर्यंत त्या हा व्यवसाय सांभाळत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.