Pune Malshej Ghat Accident News: Saamtv
मुंबई/पुणे

Malshej Ghat Accident: माळशेज घाटाची सफर जिवावर बेतली! बस- दुचाकीचा भीषण अपघात; मुंबईतील तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Pune Malshej Ghat Accident News: माळशेजच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबईमधील रोहित डिंगळकर आणि नंदिनी मयांगडे हे दोघे तरुण आणि तरुणी मुंबईवरुन वर्षा सहलीसाठी आले होते. सहल करुन परत जाताना त्यांच्या दुचाकीचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला.

रोहिदास गाडगे

पुणे, ता. २५ जून २०२४

माळशेज घाटात वर्षाविहारासाठी आलेल्या मुंबईतल्या तरुण-तरुणीचा अपघातात मृत्यु झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. पांढरे धुके अन् वळणाच्या रस्त्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळशेज घाटातल्या निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यामुळे मोठया संख्येने पर्यटक माळशेज घाटात पावसाळी सहलीचे आयोजन करत असतात. मात्र माळशेज घाटाची सफर मुंबईतील तरुण- तरुणीला चांगलीच महागात पडली असून भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

माळशेजच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबईमधील सांताक्रुज परिसरात राहणारे रोहित डिंगळकर आणि नंदिनी मयांगडे हे दोघे तरुण आणि तरुणी वर्षा सहलीसाठी आले होते. सहल करुन परत जाताना त्यांच्या दुचाकीचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, पांढरे शुभ्र धुकं आणि नागमोडी वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून माळशेज घाटात वर्षाविहारासाठी येत असताना पर्यटकांनी स्वतची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT