Maharashtra Water Crisis Saam TV
मुंबई/पुणे

Pune Breaking News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पाणी कपातीचे संकट टळले; शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडण्याचा मोठा निर्णय

Pune Water Crisis: पुणे शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत यासंबंधीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे|ता. २४ फेब्रुवारी २०२४

Pune Breaking News:

पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी. पुणे शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत यासंबंधीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहराला (Pune Water Crisis) पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ 55 टक्के इतकाच पाणीसाठा उरल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. यासंबंधी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखा कालवा समितीची महत्वाची बैठक पुण्यात पार पडली.

या बैठकीत पाणी कपातीसंबंधी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस यावेळी पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात झाला होता. मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले. उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार पहिला आवर्तन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या बैठकीला पुणे, नगर आणि सोलापुर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी उपस्थित होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही या बैठकीला हजेरी लावली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT