Hingoli News: आमदारांच्या नावाचं स्टिकर लावून अवैध वाळू वाहतूक? बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

Misuse Of MLA Name In Hingoli: हिंगोलीत आमदारांच्या नावाने गैरप्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. खाजगी वाहनावर विधानसभा सदस्य स्टिकर लावून अवैध प्रकार होत असल्याचा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे.
Hingoli News
Hingoli NewsSaam Tv
Published On

BJP MLA Tanaji Mutkule Complaint

हिंगोलीत (Hingoli) आमदारांच्या नावाने गंभीर प्रकार सुरू आहे. खाजगी वाहनावर विधानसभा सदस्य स्टिकर लावून अवैध प्रकार होत आहेत, असा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. आमदार मुटकुळे यांच्या यासंदर्भात लेखी तक्रार दिली. (Latest Marathi News)

हिंगोलीत आमदाराच्या नावाने गैरप्रकार सुरू आहेत. चारचाकी वाहनांवर विधानसभा सदस्य असल्याचे स्टिकर लावले जाते. त्यानंतर गाडीमध्ये शस्त्र ठेवले जातात, अशी तक्रार भाजप आमदाराने (BJP MLA Tanaji Mutkule) केली आहे. या तक्रारीनंतर हिंगोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विधानसभा स्टिकर असणाऱ्या गाड्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोलीत आमदारांच्या नावाचा गैरवापर

हिंगोली जिल्ह्यात आमदारांच्या नावाने गैरप्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला (Misuse Of MLA Name In Hingoli) आहे. चार चाकी वाहनांवर विधानसभा सदस्य नावाचं स्टिकर लावून अनेकजण स्वतः आमदार असल्यासारखं वागत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे.

हिंगोलीत वाहनांवर आमदारांच्या नावाचं स्टिकर लावून अवैध वाळू वाहतुक सुरू असल्याचा आरोप केला जात (Hingoli News) आहे. आमदारांच्या नावाने स्टिकर लावलेल्या गाड्यांमध्ये अवैध शस्त्र आहेत. हे वाहनचालक अवैध वाळू वाहतुकीसाठी हे वाहन वापरत आहेत.

Hingoli News
Navi Mumbai Crime News : वाशीतील प्रसिद्ध मॉलमधील स्पामध्ये सुरु होतं भलतंच काम; पोलिसांनी धाड टाकली अन्...

हिंगोली जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर

प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचं मुटकुळे म्हणाले आहेत. आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या तक्रारीनंतर (BJP MLA Tanaji Mutkule Complaint) हिंगोली जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने या वाहनांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या घटनेमुळे हिंगोलीमध्ये खळबळ उडाली आहे. आता अशा नेमप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

Hingoli News
Ahmednagar Crime : सोनई अत्याचार प्रकरण; महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com