सुशील थोरात
अहमदनगर : वारंवार आवाहन करून देखील कराची थकबाकी भरली जात नाही. यामुळे अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या वतीने थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नावाचे फलक शहरातील विविध चौकात लावण्यात आले आहेत. महानगरपालिकेने लावलेल्या थकबाकी दारांच्या नावांमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचा समावेश आहे. मार्चएन्ड आल्याने मनपाने जास्तीत जास्त वसुली व्हावी; म्हणून अशा पध्दतीने बॅनर लावले आहेत. (Latest Marathi News)
अहमदनगर महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तसेच वर्षाखेरीस शास्तीत ७५ टक्के माफी देखील दिली. तरी देखील थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी कानाडोळा केला. यामुळे अखेर अहमदनगर मनपाने (Tax) कर बुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स शहरातील चौकाचौकात लावले आहेत. महापालिकेने आतापर्यंत ८४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर होणार कडक कारवाई
अजूनही करोड रुपये मालमत्ता धारकांकडे थकलेले असून अनेकवेळा संधी देऊनही थकीत कर भरला जात नसल्याने नागरिकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे; अन्यथा पुढील काळात कडक कारवाई केली जाईल असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.