आरक्षणासाठी धनगर समाजाचा देखील लढा सुरु आहे. दरम्यान आज धनगर समाजाला आरक्षण मिळावे; यासाठी (Beed) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर यशवंत सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. (Live Marathi News)
धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र यावर सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एका समितीची देखील स्थापना करण्यात आली होती. मात्र ही समिती आता पाकिस्तानात गेली आहे का? असा सवाल आंदोलन करणाऱ्या धनगर समाज बांधवांनी उपस्थित केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धनगर समाजाकडून अनेक वेळा आंदोलन, मोर्चा काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने समाज आक्रमक झाला असून तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लागला, तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.