Ahmednagar Crime : सोनई अत्याचार प्रकरण; महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

Womens Commission : सोनई परिसरातील एका चर्चच्या पास्टरने १० वर्षीय दोन मुलींचे लैगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीय. घटनेतील तीन आरोपींना पोलीसांनी गजाआड केले असून अधिक तपास सुरू आहे.
Ahmednagar Crime
Ahmednagar Crimesaam Tv

(सचिन बनसोडे, अहमदनगर)

Womens Commission Met Family Members Of Victim:

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई परिसरात १० वर्षीय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतलीय. महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी पीडित मुलीची आणि कुटुंबीयाची भेट घेऊन घटनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. मुलीची सुरक्षा आणि कुटूंबीयांना आधार देण्यासाठी रूपवते यांनी पोलीस प्रशासनाला सुचना केल्या आहेत. (Latest News)

सोनई परिसरातील एका चर्चच्या पास्टरने १० वर्षीय दोन मुलींचे लैगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीय. घटनेतील तीन आरोपींना पोलीसांनी गजाआड केले असून अधिक तपास सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते सबंधित पीडित मुली आणि कुटुंबियांच्या भेटीला पोहचल्या होत्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची अशीच एक घटना १८ फेब्रुवारी रोजीही घडली होती. या प्रकरणी नईम मुन्ना खान नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी अल्पवयीन मुलगी मुळची उत्तर प्रदेश राज्यातील असून सध्या नातेवाईकांकडे नालेगाव परिसरात राहत होती. पीडिता राहत असलेल्या घरी आरोपीने वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

घडत असलेल्या अत्याचामुळे पीडितीने नालेगाव सोडून एका व्यक्तीच्या माध्यमातून संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठलं. परंतु ही घटना नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडल्यामुळे संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने पीडितेला तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तेथे तिने दिलेल्या फिर्यादीवरून नईम खान विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय.

Ahmednagar Crime
Crime News: 20 लाखांचं गिफ्ट घेऊन गर्लफ्रेंड गेली पळून; EMI भरणाऱ्या बॉयफ्रेंडची पोलीस ठाण्यात धाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com