प्रेमात धोका मिळाल्याच्या आजवर तुम्ही अनेक घटना ऐकल्या असतील. अशात बिहारमध्ये एका प्रेयसीने आपल्या प्रियकराचे लाखो रुपये घेऊन त्याला सोडून दिलं आहे. प्रेमापोटी तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला लाखोंचे गिफ्ट्स दिले. ती सुखी राहावी म्हणून लाखोंच्या घरात पैसे खर्च केले. त्यानंतर तरुणाने लग्नाबाबत विचारले तेव्हा तरुणीने त्याला सरळ नकार दिला.
मुजफ्फरपुर येथे हा तरुण राहतो. तरुणी देखील सुरुवातीला याच परिसरात राहत होती. महाविद्यालयात या दोघांची एकमेकांशी ओळख झाली. अभ्यासासाठी दोघांचे एक दोन वेळा बोलणे झाले. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. मैत्री इतरी घट्ट झाली की, काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यावेळी प्रेयसीने प्रियकराला लग्नासाठी देखील होकार दिला होता.
शिक्षण (Education) पूर्ण झाल्यावर दोघांनीही नोकरी करण्यास सुरुवात केली. तरुणीला पाटना येथे वैद्याकीय क्षेत्रात नोकरी मिळाली. तिच्या सोईसाठी तरुणाने तिला एक प्लॅट खरेदी करून दिला. यासह एक आयफोन देखील भेट म्हणून दिला होता. इतकेच नाही तर आजवर त्याने तिला अनेक गिफ्ट्स भेट म्हणून दिले आहेत.
४ वर्षांच्या या रिलेशनमध्ये त्याने आतापर्यंत तरुणीला २० लाखांचे गिफ्ट्स भेट म्हणून दिले होते. मात्र दिवसेंदिवस तरुणीची मागणी वाढत होती. ती सतत या पेक्षाही महागड्या गिफ्ट्सची मागणी तरुणाकडे करत होती. मात्र यावेळी त्याने आधी लग्ना करण्यास सांगितले. तेव्हा तरूणीने त्याच्याशी भांडण केले. तरुण आपल्या लग्नाच्या निर्णयावर ठाम असल्याने प्रेयसीने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याच्याशी असलेला संपर्क तोडला.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी तरुणाच्या सांगण्यावरून प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच प्रेयसी सध्या कुठे आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. तरुणाने तिच्यासाठी महागडी कार देखील गिफ्ट केली होती. तरुणीने ही कार आता तिच्या आईच्या नावे केली आहे. तसेच घर देखील कुटुंबातील अन्य एका व्यक्तीच्या नावे केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.