Bihar Politics : बिहारमध्ये मोठा उलटफेर होणार? नितीशकुमार सरकारची आज फ्लोअर टेस्ट; कसं आहे जागांचा समीकरण?

Bihar Politics : बिहारमध्ये इंडिया आघाडी तुटल्यानंतर आरजेडीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले होते की, खेळ नुकताच सुरू झाला आहे, खेळ अजून खेळायचा आहे.
Nitish Kumar
Nitish Kumar Saam TV
Published On

Bihar News :

बिहारमध्ये आज एनडीए सरकारची फ्लोअर टेस्ट होणार आहे. नितीशकुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते बहुमत सिद्ध करू शकतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यामध्ये एनडीएचे एकूण १२८ आमदार आहेत. भाजपचे ७८ आमदार, जेडीयूचे ४५ आमदार, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे चार आमदार आणि एक अपक्ष आमदार आहे. तर विरोधी पक्षात एकूण ११५ आमदार आहेत, त्यापैकी ७९ आरजेडीचे, १९ काँग्रेसचे, १६ डाव्यांचे आणि एक एआयएमआयएमचा आमदार आहे. (Latest Marathi News)

Nitish Kumar
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का, बालेकिल्यातील सोसायटीवरील सत्ता हातातून निसटली

तेजस्वी यादव यांची भविष्यवाणी खरी होणार?

बिहारमध्ये इंडिया आघाडी तुटल्यानंतर आरजेडीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले होते की, खेळ नुकताच सुरू झाला आहे, खेळ अजून खेळायचा आहे. तेजस्वी यादव यांची भविष्यवाणी खरी ठरणार का? नितीश कुमारांचे चार आमदार गायब झाल्यानंतर फ्लोअर टेस्टमध्ये मोठा खेळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेडीयूचे आमदार ना बैठकीला हजर राहिले ना फोन उचलत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी हे नितीश कुमार यांच्यावर आधीच नाराज आहेत.

Nitish Kumar
Bihar Politics: बिहार विधानसभा अध्यक्षांचीच खुर्ची धोक्यात? NDAच्या बहुमत चाचणीआधीच होणार मोठा राजकीय खेळ

आकड्यांचं गणित

एनडीएतील जेडीयूच्या ४ बेपत्ता आमदारांची संख्या वजा केली तर हा आकडा १२४ होईल. यानंतर एनडीएकडे बहुमत असेल आणि नितीश यांचे सरकार फ्लोअर टेस्ट पास करेल.

अशात नितीशकुमार यांचं सरकार जीतमराम मांझी यांच्यावर अवलंबून आहे. जर मांझी यांनीही अचाकक विचार बदलला तर नितीश सरकार अडचणीत येईल आणि तेजस्वी यादव यांचे म्हणणे खरे ठरेल.

जीतनराम मांझी यांचे ४ आमदार असून ते एनडीएला पाठिंबा देत आहेत. तर इंडिया आघाडीच्या आमदारांची संख्या ११५ आहे. परिस्थितीत तेजस्वी यादव यांना सरकार स्थापन करण्यासाठी आणखी फक्त ७ आमदारांची गरज आहे. अशा परिस्थितीत चारपैकी तीन बेपत्ता जेडीयू आमदारांनी आणि मांझी यांनी पाठिंबा दिल्यास तेजस्वी यादव सरकार स्थापन करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com