Bihar Politics: बिहार विधानसभा अध्यक्षांचीच खुर्ची धोक्यात? NDAच्या बहुमत चाचणीआधीच होणार मोठा राजकीय खेळ

Bihar Assembly Speaker: एनडीएच्या बहुमतापूर्वीच विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आलाय. बहुमत सिद्ध होण्यापूर्वी या प्रस्तावावर उद्या चर्चा होणार आहे.
Bihar Assembly Speaker
Bihar Assembly SpeakerSaam Tv
Published On

Bihar Politics Avadh Bihari Chaudhary:

बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून परत एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. उद्या (१२ फेब्रुवारी) नव्या एनडीए सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र याआधी बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. एनडीएच्या बहुमतापूर्वीच विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आलाय. बहुमत सिद्ध होण्यापूर्वी या प्रस्तावावर उद्या चर्चा होणार आहे.(Latest News)

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बिहार विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव विधानसभेच्या कामकाजाच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. त्याचबरोबर नितीश सरकार विश्वासमत सादर करण्याआधी या अविश्वासावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाच्या ३८ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केलाय.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज झा म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी एकूण १२२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. विधानसभा अध्यक्षांना खुर्चीवरून दूर करण्यासाठी बिहार विधानसभेच्या एकूण २४३ आमदारांपैकी सुमारे १२२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

राजकीय हालचालींना वेग

बिहारमध्ये राजकीय खलबते जोरात सुरू आहेत. रविवारी भाजपने आपल्या आमदारांना नजरकैदेत ठेवले. तर शनिवारी आरजेडीच्या आमदारांना तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्याचवेळी काँग्रेसने आपले आमदार हैदराबादला पाठवले आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आपल्या मुलाला नवीन सरकारमध्ये एससी, एसटी कल्याणसह तीन विभाग मिळण्यावर प्रश्न उपस्थित केलाय.

Bihar Assembly Speaker
Nitish Kumar: मोठी बातमी! नितीश कुमार यांनी 9व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com