Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का, बालेकिल्यातील सोसायटीवरील सत्ता हातातून निसटली

Radhakrishna Vikhe Patil shirdi : साईबाबा संस्थान कर्मचारी वर्गाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या साईबाबा संस्थान क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 17 जागा जिंकल्या.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSaam tv
Published On

सचिन बनसोडे, अहमदनगर

Radhakrishna Vikhe Patil Latest News :

साईबाबा संस्थान कर्मचारी वर्गाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या साईबाबा संस्थान क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 17 जागा जिंकल्या. विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटील समर्थकांच्या सत्ताधारी साई जनसेवा पॅनल आणि साई हनुमान पॅनलचा धुव्वा उडवला आहे. गणेश साखर कारखाना निवडणुकीनंतर महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हा आणखी एक मोठा धक्का मानला ‌जात आहे. (Latest Marathi News)

या निवडणुकीत साई जनसेवा, साई हनुमान पॅनल हे विखे पाटील समर्थकांचे होते, तर कामगार नेते विठ्ठल पवार यांनी परिवर्तन हा स्वतंत्र पॅनल उभा केला होता.परिवर्तन पॅनलने सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून विठ्ठल पवार यांची ओळख आहे. मागील निवडणुकीत पवार यांना केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी संस्थान कर्मचारी सोसायटीच्या सभासद मतदारांनी विठ्ठल पवार यांना कौल दिला. (Shirdi Latest News)

Radhakrishna Vikhe Patil
Mahesh Gaikwad Health Update : उल्हासनगर गोळीबार प्रकरण, महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

या निवडणुकीसाठी 97.50 टक्के मतदान पार पडले होते. सुरूवातीपासूनच परिवर्तन पॅनलने आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत‌ टिकवली. सर्व मतदान हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले, ज्यात मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान केल्याने परिवर्तनचे सर्व उमेद्वार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विठ्ठल पवार यांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात यांनी देखील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. दरम्यान विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला.

Radhakrishna Vikhe Patil
CM Shinde: हे सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणारं नाही; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर

विजयानंतर विठ्ठल पवार काय म्हणाले?

विठ्ठल पवार म्हणाले, साईबाबांच्या आशिर्वादामुळे आणि साई संस्थानमधील सर्वच कामगारांच्या पाठिंब्यामुळे विजय झाला आहे. माझ्या मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी मला साथ दिली त्यामुळेही विजय शक्य झाला. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करतोय आणि संघर्षाची पावती म्हणून सर्व कामगारांनी आमच्यावर जबाबदारी टाकली. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या देवस्थानची संस्था असल्याने भविष्यात आम्हाला ते पुढे नेण्यासाठी काम करावे लागेल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com