Mahesh Gaikwad Health Update : उल्हासनगर गोळीबार प्रकरण, महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Mahesh Gaikwad health update : माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड सध्या धोक्यातून बाहेर आहेत. त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे.
Mahesh Gaikwad Health Update
Mahesh Gaikwad Health Update Saam tv
Published On

विकास काटे, ठाणे

Ulhasnagar Firing News Update :

उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाड अटकेत आहे. याचदरम्यान, या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंदे गटाचे नेते, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड सध्या धोक्यातून बाहेर आहेत. त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यातच केलेल्या गोळीबारात शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. गोळीबारातील जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्यांना आता जनरल वॉर्डमध्ये शिप्ट केल्याची माहिती मिळाली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेश गायकवाड डेंजर झोनमधून बाहेर

महेश गायकवाड यांना यआधी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी व्हेटिलेचरवरून काढण्यात आले होते. आता त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. चिंताजनक प्रकृती असलेल्या महेश गायकवाड यांची प्रकृती आता डेंजर झोनमधून बाहेर आली आहे.

गोळीबार प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात पोलीस कोठे कमी पडले, दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात कसे आले, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज का घेता आला नाही. पोलीस ठाण्यात महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही एकाच दालनात असताना तेथे पोलीस अधिकारी नव्हते. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण इतक्या तातडीने माध्यमांमध्ये प्रसारित कसे झाले, असे विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर या प्रकरणात उपस्थित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com