राज्यात होत असलेल्या गोळीबारीच्या घटनांवरून महाआघाडीच्या नेत्यांनी युतीच्या सरकारला धारेवर धरलंय. मोहोळ, गायकवाड, आणि आता घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. राज्यात गुंडाराज चालू असल्याचा घणाघात विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरात उत्तर दिलंय. (Latest News)
हे सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणारं नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना जोरदार उत्तर दिलं. मेळाव्यात संबोधन करताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. ते नागपूर येथील रामटेक शहरातील नेहरू मैदानात शिव संकल्प कार्यकता मेळाव्यात बोलत होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला मारला.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दहिसरमधील ठाकरे गटातील नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबारीची घटना झाली. यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला. त्याआधी पुण्यात शरद मोहोळ त्यानंतर उल्हासनगर येथे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. राज्यात वाढलेल्या गोळीबारीच्या घटना आणि इतर गुन्ह्यांवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंवर या प्रकरणावर हल्लाबोल केला होता. त्याला आज मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं.
बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेली
शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यापासून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दात टीका करतात. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच भाषेत उत्तर देत असतात. नागपूरमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री शिंदेंनी अभिनेत्री कंगना राणावतचं उदाहरण देत ठाकरेंवर निशाणा साधला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या बेईमानीशी तडजोड हा एकनाथ शिंदे करणार नाही. आपले सरकार आज बाळासाहेब यांची भूमिका घेऊन पुढे जात असल्याचं शिंदे म्हणाले. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी ४० टक्के समाज कारण २० टक्के राजकारण केलं आणि त्याला सगळ्यांनी साथ दिली. त्याचप्रमाणे आपण पुढे जात असल्याच शिंदे म्हणाले. ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुमचे सरकार असताना तुम्ही कंगना रणावतचे घर पाडले. गृहमंत्र्यांनी यांनी खंडणी मागितली. तर आम्ही धनुष्यबाण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मी चुकीचे केले असते तर इतके लोक आले असते का, असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी केला.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
इंडिया आघाडी बिघडी झाली आहे, नरेंद्र मोदीशिवाय आपल्याला पर्याय नाही.
अबकी ४५ पार भूमिका घ्यायची आहे.
५० वर्षात काँग्रेसने घोटाळे केले आणि पंतप्रधान मोदींनी १०वर्षात काम केले हे आपण आपन पाहिले आहे.
भ्रष्टाचारामध्ये बुडालेल्या कॉंग्रेसला धडा शिकवायचा आहे.
पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा रामटेकवर फडकवायचा आहे.
फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. शेतकऱ्यांना भेटनारा आहे, घरी बसतात. त्यांना कायमच घरी बसवणारा मतदार आहे.
दाढी खेचून आणू ही दाढी हलकी आहे का. दाढी फिरली तर, माझा नादाला लागू नका.
पुन्हा रामटेकवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.
यांना मी मुख्यमंत्री झालीच पचनी पडत नाही.
मोघलांना धनाजी सन्ताजी दिसत होते तसा मी विरोधकानाचा डोळ्यात खुपत आहे
मी शेतकरी मुलगा आहे, हेलिकॉप्टरने फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली बरी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.