Breaking News Latest Updates : राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

Maharashtra politics Live Updates : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
Maharashtra politics Live Updates in Marathi 11 February 2024
Maharashtra politics Live Updates in Marathi 11 February 2024Saam TV
Published On

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधून उमेदवार जाहीर केले आहेत.

पोलिसांनी कोणत्याही दबावाशिवाय ४८ तास द्या, सर्वच बंद होईल; शर्मिला ठाकरे

राज्यातील पोलीस सक्षम आहेत त्यांना राजकीय प्रेशर न देता 48 तास दिले तर सर्व मारामाऱ्या बंद होतील

कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही; CM एकनाथ शिंदे

लोक म्हणतात राष्ट्रपती राजवट लावा

काशासाठी, राष्ट्रपती लागवट अशीच लागते का,

कुठेलिही गुन्हेगाराला पाठीशी घालणार सरकार नाही

तुमच्या काळात हनुमान चाळीसा म्हणणाऱ्यांना जेल मध्ये घातले

गृहमंत्री यांनी खंडणी मागितली

कोल्हापुरात ध्येय पब्लिकेशन अकॅडमीने आयोजित केलेल्या परीक्षेदरम्यान गोंधळ

आयोजकांनी परीक्षाच रद्द केल्याने पालकांचा गोंधळ

पहिली ते नववी ची 'आय एम विनर' नावाच्या परीक्षेचे केले होते आयोजन

पद्मराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालकांचा गोंधळ

अनेकांना प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत तर पहिलीच्या मुलांना चौथीच्या मुलांची तर चौथीच्या मुलांना पहिलीच्या मुलांची प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ

हरिभाऊ राठोड यांना जरांगे पाटालांच्या स्टेजवर जाण्यास रोखलं

हरिभाऊ राठोड जरांगे पाटलांच्या भेटीला अंतरवालीत

मात्र हरिभाऊ राठोड यांना जरांगे पाटालांच्या स्टेजवर जाण्यास रोखले

सरपंच आणि दोन तीन मराठा आंदोलकांसोबत चर्चा करून राठोड माघारी परतले

चर्चा झाली नाही तरी चालेल मात्र जरांगे पाटलांना शुभेच्छा- हरिभाऊ राठोड

सत्र न्यायालयांचा उल्लेख कनिष्ठ न्यायालय असा करू नका', सुप्रीम कोर्टाचे नोंदणी कार्यालयाला निर्देश

सत्र न्यायालयांचा कनिष्ठ न्यायालये असा उल्लेख केला जातो. त्यामुळे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नोंदणी कार्यालयाला यापुढे कनिष्ठ न्यायालय असा उल्लेख करू नका अशा सल्ला दिला आहे. न्या. एस. ओक आणि न्या. भुयान यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यात गारपीटीसह पाऊस; हरभरा, गहू ज्वारीच्या पिकांच नुकसान

नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात गारपीट तर काही ठिकाणी तुरळक पाऊस.

अँकर:- नांदेड जिल्हयातील काही तालुक्यातआज सायंकाळी आवकाळी आणि गारपीट झालीय. हवामान खात्याने ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर, किनवट, आणि भोकर तालुक्यात अवकाळी पाऊस झालाय. हिमायतनगर तालुक्याला गारपिटीने झोडपले. दरम्यान आज दुपारपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या हरभरा, गहू,आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.

जे तुरुंगात जाऊन आले, ते कोणत्या सत्याग्रहासाठी गेले नव्हते; निलम गोरेंचा संजय राऊतांवर निशाणा

जे स्वता चौकशीसाठी तुरुंगात जाऊन आले, ते कुठल्या स्वतंत्र च्या सत्याग्रहासाठी गेले नव्हते

संजय राऊत यांचे नाव न घेता नीलम गोरे यांची टीका. काल संसदेत मोदींच्या भाषणाचा विचार करण्याऐवजी केवळ राजकीय द्वेशातून टीका केली जात आहे.

वर्धा जिल्ह्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा, पिकांचं अतोनात नुकसान

हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील अनेक भागात गारपीट

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट

सलग दोन दिवसात झालेल्या गारपिटीने शेतकरी त्रस्त

शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

दोन्ही बाजूच्या संभाव्य उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला वेग

उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय शिर्डी लोकसभेच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या अयोध्येला जाणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या अयोध्येला जाणार

केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील रामलल्लाच घेणार दर्शन

दोन्ही मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार दर्शन

केजरीवाल यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी पत्र लिहून लवकरच मी दर्शनाला येईल अस न्यासला कळवलं होत

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश, पार्श्वभूमी न पाहता पक्षप्रवेश दिल्याने नाराजी

शिवसेनेत ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

पक्ष प्रवेशा वरून शिवसेना शिंदे गटात मात्र नाराजी.

पाश्वभूमी न पाहता पक्ष प्रवेश दिल्याने नाराजी.

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होतं असताना, गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या नरेश सपकाळ या तरुणाचा पक्ष प्रवेश.

हाफ मर्डर, खंडणी, आर्थिक फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे नरेशवर दाखल.

पक्षप्रवेश देत युवासेना उपजिल्हा प्रमुख म्हणून तात्काळ पदनियुक्ती देखील करण्यात आली.

शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला पक्षप्रवेश.

अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही लक्ष ठेवून आहोत,

देवेंद्र फडणवीस

अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही लक्ष ठेवून आहोत, सर्व प्रकारचे अलर्ट्स देखील आम्ही दिलेले आहेत

ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नुकसान होईल तेथे आपण मदत करतोच

पण नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील अलर्ट देण्यात आले आहेत

भारतरत्न देऊन त्या राज्याचा पाठिंबा मिळेल असा भाजपचा भ्रम आहे - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

भारतरत्न कधी आणि कुणाला द्यायचा याची काही सूत्र होती

आता आले मोदींच्या मना द्यावे अनेकांना, उद्धव ठाकरेंची टीका

स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, आता त्यांच्या अहवालाची अंमलबजावणी करा

येत्या काही दिवसात अनेक भारतरत्न जाहीर होतील

राज्यात असे भारतरत्न देऊन त्या राज्याचा पाठिंबा मिळेल असा त्यांचा भ्रम आहे

पालघर : बोईसर तारापूर एमआयडीसीत कारखान्यात वायू गळती

पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत कारखान्यात वायू गळती

जे -180 मे अक्षय इंडस्ट्रीत वायू गळती

वायू गळतीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य

वायू गळतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

परभणीत मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील घटना तालुक्यातील नरवाडी येथील घटना

उद्धव बाळासाहेब जोगदंड असे मृत तरुणाचे नाव

जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल

तीन दिवसात आरक्षणासाठी दुसरी आत्महत्या

काल सेलू तालुक्यातील राजवाडी येथील तरुण प्रताप शेवाळे नावाच्या तरुणाने देखील केली होती गळफास लावून आत्महत्या

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण अपडेट, रणजीत यादवला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण अपडेट

गणपत गायकवाड यांचा चालक रणजीत यादवला अटक

रणजीत यादवला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मुलानेच केली आईची हत्या, पुण्यातील खडकी पोलीस ठाणे हद्दीतील घटना

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना

मुलानेच केली आईची हत्या, खडकी पोलीस ठाणे हद्दीतील घटना

ज्ञानेश्वर पवार असं आरोपी मुलाचं नाव, तर गुंभाबाई पवार असं मृत महिलेचं नाव

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

सोलापुरात पार पडणार आज 'निर्भय बनो' सभा

सोलापुरात पार पडणार आज 'निर्भय बनो' सभा

पुण्यात निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सोलापुरातील सभेला प्राप्त झालं महत्व

सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अॅड.असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरी करणार सभेला मार्गदर्शन

युवा पँथरचे कार्यकर्ते देणार सभेला संरक्षण

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

मार्शल लीलाकर असे ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव

पोलिसांनी आरोपीला परवा केली होती अटक

सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला केलं होतं अटक

टी राजा सिंह यांच्या सभेला अमरावती मध्ये परवानगी नाकारली

टी राजा सिंह यांच्या सभेला अमरावती मध्ये परवानगी नाकारली

नेहरू मैदानावर पोलीस बंदोबस्त

नेहरू मैदानाचे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले

सकल हिंदू समाजाच्या मागणीला पोलिसांनी परवानगी नाकारली

पोलिसांकडून आयोजकांना नोटीस जारी

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे सभेची परवानगी नाकारली

नागपूर ते अयोध्या धाम स्पेशल ट्रेन आज नागपूर रेल्वेस्थानकावरून रवाना

नागपूर ते अयोध्या धाम स्पेशल ट्रेन आज नागपूर रेल्वेस्थानकावरून रवाना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अयोध्या धाम स्पेशल ट्रेनला हिरवी झेंडा दाखवली

आज साकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवरुन निघालेली ही स्टेशन ट्रेन उद्या अयोध्येत पोहोचेल

या अयोध्या धाम स्पेशल ट्रेनमध्ये नागपूरातील एक हजार पेक्षा जास्त रामभक्त श्री रामाच्या दर्शनासाठी झाले रवाना

पुणे विभागात पुणे ते लोणावळा तांत्रिक कामासाठी ब्लॉक

मध्य रेल्वेच्या आज पुणे विभागात पुणे ते लोणावळा तांत्रिक कामासाठी ब्लॉक

पुणे ते लोणावळा १४ लोकल गाड्यांवर परिणाम

१४ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे या मार्गावरील गाड्यांचा समावेश

आमदार संजय कुटे यांची भाजपातून हकालपट्टी करा

दलित महिला सरपंच यांचा आमदार संजय कुटे यांनी अपमान केल्याचे प्रकरण

भाजपातून आमदार कुटे यांची हकालपट्टी करा

रिपाईच्या (खरात) सचिन खरात यांनी केली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

तर घटना निंदनीय असून केला घटनेचा निषेध

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com