Pune Metro: पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रिटर्न तिकीट सेवा 1 मार्चपासून होणार बंद

Pune Metro News: पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महामेट्रोकडून परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा बंद करण्यात येत आहे.
Pune Metro
Pune Metro Saam Tv
Published On

नितीन पाटणकर

Pune Metro Return Ticket Service

पुणे (Pune) शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. परंतु मेट्रो व्यवस्थापन काही सेवांमध्ये बदल करत आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महामेट्रोकडून तिकीट सेवेत थोडासा बदल होत आहे, आपण त्याबद्दल जाणून घेऊ या.  (Latest News)

पुण्यात मेट्रोच्या परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा (Return Ticket Service) होणार बंद आहे. महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा येत्या 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. या निर्णयामुळे आता मेट्रो प्रवाशांचे तिकिटांसाठी होणार हाल होणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा

सध्या पुणे मेट्रोची (Pune Metro) दैनंदिन प्रवासी संख्या ५५ हजार आहे. ही प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामेट्रो सातत्याने पावले उचलत आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, या उद्देशाने पुणे मेट्रोने (Metro) प्रवाशांना परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा दिली होती. पण १ मार्चपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय आता महामेट्रोने घेतला आहे.

महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना जाताना आणि येताना असं दोन वेळा तिकीट काढावं लागणार (Pune Metro Return Ticket) आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर आता गर्दी वाढणार आहे.

Pune Metro
Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

महामेट्रोचा निर्णय

प्रत्येक मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसून येते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना मेट्रोचे अॅप, व्हॉट्सअॅप क्रमांक, एटीव्हीएम यंत्राच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधाही दिलेली आहे. आधी महामेट्रोने प्रवाशांना तिकीट काढल्यानंतर २० मिनिटांत प्रवास करणं बंधनकारक केलं (Pune Metro News) होतं.

अनेक प्रवासी तिकीट काढून मेट्रो स्थानकात जातात. आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय (Pune News) होते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणं, बंधनकारक केलं होतं. मेट्रो प्रवाशांची संख्या कशी वाढेल, याकडे महामेट्रो लक्ष देत आहे.

Pune Metro
Pune Metro: मुठा नदीच्या पात्राखालून धावली पुणे मेट्रो; पुणेकरांचा प्रवास होणार सोईस्कर,कधी खुला होणार नवा मार्ग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com