मुठा नदीच्या पात्राखालून सुमारे १३ मीटरवरून पहिल्यांदाच मेट्रो धावली. शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान ३. ६४ किलोमीटर अंतरावर भुयारी मेट्रोची चाचणी करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांनी शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल, अशी शक्यता या यशस्वी चाचणीमुळे वर्तवली जात आहे. (Latest News)
भूमिगत मेट्रोमुळे दोन महिन्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिका (Municipal Corporation) स्थानके ते स्वारगेट स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेट गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडियम आदी ठिकाणी मेट्रोने जाणं सोईस्कर होईल.
. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान भूमिगत मेट्रोची (Metro) चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू झाली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ११ वा. ५९ मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानकात पोहोचली. या चाचणीसाठी सुमारे १ तास लागला. या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किलोमीटर होता. वनाज- रामवाडी (१६ किलोमीटर) आणि पिंपरी चिंचवड- स्वारगेट (१७ किलोमीटर) या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.
उर्वरित मार्गाची कामे वेगात सुरू आहेत. सध्या मेट्रो पिंपरी चिंचवड-स्वारगेट मार्गावर आणि पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान धावत आहे. या मार्गावर शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भूमिगत मेट्रोची चाचणी पहिल्यांदा झालीये. भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी मुठा, मुळा आणि पवना या ३ टनेल बोअरींग मशीनचा (टीबीएम) वापर करण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचे काम २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आले होते. प्रत्येकी ६ किलोमीटर अंतराच्या दोन भुयारी मेट्रोचे खोदकाम काम ४ जून २०२२ रोजी पूर्ण झाले आहे.
शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गाची चाचणी पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे येत्या २ महिन्यांत पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा थेट प्रवास शक्य होईल. रुबी हॉल क्लीनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात हा मार्ग प्रवाश्यांसाठी सुरु होऊ शकेल, असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं.
हे स्थानके असतील जमिनीखाली
शिवाजीनगर न्यायालय - जमिनीपासून ३३ मीटर खोल
बुधवार पेठ स्थानक - ३० मीटर खोल
महात्मा फुले मंडई स्थानक - २६ मीटर खोल
स्वारगेट स्थानक - २९ मीटर खोल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.