Delhi Metro Slab: मेट्रो स्टेशनचा स्लॅब रस्त्यावर कोसळला; काहीजण ढिगाऱ्याखाली दबले, बचावकार्य सुरू

Metro Slab Collapses In Gokalpuri, Delhi: दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनचा स्लॅब रस्त्यावर कोसळला आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.
Delhi Metro Slab Collapses In Gokalpuri Area Rescue Going On
Delhi Metro Slab Collapses In Gokalpuri Area Rescue Going OnSaam Tv
Published On

Delhi Metro Slab Collapses

दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर (Delhi Metro) धक्कादायक घटना घडली आहे. चारदीवाकीत मेट्रो स्टेशनच्या एका भिंतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन ते चार लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. (Latest Crime News)

स्लॅब खाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यात आलंय. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी जेसीबी आणि क्रेनला आणलं गेलं आहे. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झालीय. याबाबत चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं (Delhi Metro Slab Collapses) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळला

गुरुवारी दिल्लीतील गोकुळपुरी भागात मेट्रोचा स्लॅब (Metro Slab Collapses In Gokalpuri Area) कोसळला. ढिगारा रस्त्यावर पडल्यानं त्याखाली चार दुचाकी गाडल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

हा अपघात सकाळी 11.05 वाजेच्या सुमारास झाल्याची माहिती मिळतेय. गोकुळपुरी मेट्रो स्टेशनखाली नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. त्यानंतर अचानक मेट्रो स्टेशनच्या स्लॅबचा मोठा भाग जमिनीवर पडला. या अपघातात तेथून जाणाऱ्या 4 दुचाकीस्वार ढिगाऱ्याखाली अडकले होते.

मेट्रो प्रशासनावर प्रश्नचिन्ह

दिल्ली अग्निशमन दलाला तातडीनं या प्रकरणाची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून बुलडोझरच्या साहाय्यानं ढिगारा हटवण्याचं काम सुरू केलं (Metro news) आहे. ढिगाऱ्याखाली चारजण गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढल्यानंतर तातडीने जीटीबी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेमुळं परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मेट्रो प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बचाव मोहिमेनंतर काही वेळातच 12 वाजण्याच्या सुमारास आणखी दोन जखमींनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. त्यांनाही रुग्णालयात नेण्यात आलंय. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक ( Delhi News) आहे. ईशान्य दिल्लीचे डीसीपी जॉय तिर्की यांनी सांगितले की, जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने ढिगारा हटवला जात आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि मेट्रोचे कर्मचारी उपस्थित आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Delhi Metro Slab Collapses In Gokalpuri Area Rescue Going On
Pune Metro: मुठा नदीच्या पात्राखालून धावली पुणे मेट्रो; पुणेकरांचा प्रवास होणार सोईस्कर,कधी खुला होणार नवा मार्ग?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com