Kalyan News: कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गावरील प्लॅनचा नकाशा द्या...; केडीएमसीची एमएमआरडीएकडे मागणी

Kalyan To Taloja Metro Line: नकाशा प्राप्त झाल्यास या पूढे बांधकाम परवानगी देताना एमएमआरडीएची ना हरकत घेतल्याशिवाय तसा प्रस्ताव मंजूरीसाठी घेतला जाणार नाही अशी माहिती सहाय्यक संचालक सावंत यांनी दिली आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam TV
Published On

कल्याण अभिजित देशमुख

Kalyn News:

कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गावरील मेट्रो स्थानक तसेच अलायमेंटचा नकाशा देण्यात यावा अशी मागणी महापालिकेने एमएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे. नकाशा प्राप्त झाल्यास या पूढे बांधकाम परवानगी देताना एमएमआरडीएची ना हरकत घेतल्याशिवाय तसा प्रस्ताव मंजूरीसाठी घेतला जाणार नाही अशी माहिती सहाय्यक संचालक सावंत यांनी दिली आहे.

Kalyan News
Kalyan News: मैदान स्वच्छ करा, अन्यथा कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू; सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ते तळोजा हा मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७ सप्टेंबर २०२३ रोजी एमएमआरडीए कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीच्या तारखेपासून कल्याण डोंबिवली महापालिकेने या मार्गावरएकही बांधकाम परवानगी दिलेली नाही. ज्या परवानग्या दिल्या होत्या त्या यापूर्वीच्या आहेत अशी माहिती कल्याण डोंबिवली सहाय्यक संचालक नगररचनाकार दीक्षा सावंत यांनी दिली आहे.

या मेट्रो मार्गावरील स्थानके निश्चीत झाल्यावर महापालिकेने ट्रान्सीट ओरियंटल झोन-टीओडी क्षेत्र विकसीत निश्चीत करायचे आहे. हे टीओडी क्षेत्र निश्चीत करण्याकरीता मेट्रोच्या डिटेल प्लानचा नकाशा प्राप्त व्हावा यासाठी महापालिकेने एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठविले आहे.

एमएमआरडीए कार्यालयाकडून मेट्रोस्थानके व अलायमेंटचा नकाशा प्राप्त झाल्यास या पूढे बांधकाम परवानगी देताना एमएमआरडीएची ना हरकत घेतल्याशिवाय तसा प्रस्ताव मंजूरीसाठी घेतला जाणार नाही अशी माहिती सहाय्यक संचालक, नगरररचनाकार सावंत यांनी दिली आहे.

Kalyan News
Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या; Youtubeवरुन शोधली आयडिया, पोलीसही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com