Maharashtra Politics: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; ठाकरे गटाविरोधात कोण लढणार?

Ratnagiri-Sindhudurg Election: ठाकरे गटाकडे असलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपने मोठा प्लान आखला आहे. विनायक राऊत यांना टक्कर देण्यासाठी भाजपने तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे.
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha ConstituencySaam TV
Published On

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. ठाकरे गटाकडे असलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपने मोठा प्लान आखला आहे. विनायक राऊत यांना टक्कर देण्यासाठी भाजपने तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Pune Breaking News: शरद पवार गटाच्या ९ पदाधिकाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा; नेमकं कारण काय?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे. साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास कोकणात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे (Narayan Rane) असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सध्या हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने तो आपल्याला मिळावा, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलकही लावले आहेत. (Latest Marathi News)

पण, भाजपने हे अमान्य केले असून राणे यांना निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले आहे. सध्या कोकणात नारायण राणे आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविताना शिंदे गट राणे यांना समर्थन देणार नाही, अशाही चर्चा सुरू आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी अगदी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकमेकांना सहकार्य करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राणे यांचे नाव पहिल्या यादीत समोर येण्याची शक्यता आहे.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Manoj jarange Patil: 'गृहमंत्र्यांचे ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल...' मनोज जरांगेंचा थेट इशारा; उद्या घेणार मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com