Manoj jarange Patil: 'गृहमंत्र्यांचे ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल...' मनोज जरांगेंचा थेट इशारा; उद्या घेणार मोठा निर्णय

Maratha Aarkshan News: आजपासून (२४, फेब्रुवारी) मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे. हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.
Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil Latest News Saam TV
Published On

Manoj jarange Patil Press Conference:

सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आजपासून (२४, फेब्रुवारी) मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे. हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. तसेच आंदोलकांना दिलेल्या नोटीसीवरुनही त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"सगे सोयऱ्यांची अधिसूचना काढण्यात आली आहे. जाणूनबुजून एखाद्या मंत्र्याच्या दबावामुळे तुम्ही हा कायदा करत नाही. पूर्वी एक राजा न्याय द्यायचा. आता 3 राजे आहेत, तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर लढाई करत आहोत. फक्त आंदोलकांनी आंदोलन शांततेत करावे, मग तुमच्यावर कसे गुन्हे दाखल करतात? कशा नोटीसा देतात ते बघतो," असे मनोज जरांगे म्हणाले.

उद्याच्या बैठकीला हजर रहा..

तसेच "फक्त 11 ते 1 या वेळेत रास्तारोको करा. आज संध्याकाळपासून गावागावात धरणे आंदोलन करा. उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होईल. सगळे या, या बैठकीत महत्वाचा आणि अंतरिम निर्णय होईल, सरकार काय डाव आखतय ते मी लिहून ठेवलयं, उद्याच्या बैठकीत मी समाजाला सांगणार आहे. काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील. असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Latest News
Sadabhau Khot: 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या...' सदाभाऊ खोत यांची मागणी; शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

गुन्हे दाखल केल्यास जड जाईल..

"सरकार आता रडीचा डाव खेळत आहे. मी बदल केला म्हणजे माघार घेतली नाही. आंदोलन कोणतंही केलं तरी मागणी तीच आहे. मी हरणार नाही. आंदोलकांनी नोटीसा स्विकारल्या तरी काही होणार नाही. रास्तारोको केला म्हणून गुन्हे दाखल केल्यास मला येऊन सांगा, गृहमंत्र्यांचे ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल," असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil Latest News
Sambhajinagar News: लिफ्टमध्ये अडकल्याने श्वास गुदमरला, निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू; संभाजीनगरमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com