Maratha Reservation: जिल्हानिहाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मराठा कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच नोटीसा

Maratha Aarkshan News: सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आजपासून मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam Digital
Published On

Maratha Reservation Protest:

सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आजपासून मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे. या जिल्हानिहाय मराठा आंदोलनाच्या पार्श्भूमीवर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणसाठी आज होणाऱ्या रस्ता रोको आंदोलना दरम्यान जिल्ह्यातील अनेक मराठा कार्यकर्त्यांना CRPC १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकावर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले असल्याची माहिती पोलिस दलातील अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडून हे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची माहिती पोलिसांनाकडून गोळा केली जात असल्याचे समोर आले आहे. जालना (Jalana) तालुक्यातील नंदापुर गावातील मराठा आंदोलक विनोद उबाळे पाटील यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

Maratha Reservation
Maval Lok Sabha Constituency: मावळमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणायचा; लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने कसली कंबर

दरम्यान, या नोटीसीनुसार प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून (हस्तकाकडून) आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाईल. तसेच सदर नोटीस ही पुरावा म्हणून वापरली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Ramtek lok sabha : शिंदेंच्या गटाची अडचण होणार? रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com