Ajit Pawar On Pune Metro: महामेट्रोने स्वखर्चातील कामे त्वरित सुरू करावीत; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना

Ajit Pawar On Pune Metro: महामेट्रोने त्यांच्या खर्चातून करण्यात येणारी कामे त्वरित सुरू करावीत.उर्वरित इमारतीच्या कामासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येईल.अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामाचा त्यांनी आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
Ajit Pawar On Pune Metro
Ajit Pawar On Pune MetroSaam Story
Published On

Ajit Pawar On Pune Metro

महामेट्रोने त्यांच्या खर्चातून करण्यात येणारी कामे त्वरित सुरू करावीत.उर्वरित इमारतीच्या कामासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येईल.राज्य परिवहन महामंडळाने इमारतीतील त्यांना आवश्यक जागेची माहिती द्यावी, इतर जागेत शासकीय कार्यालयासाठी जागा देण्याबाबत प्रशासनाने माहिती घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामाचा त्यांनी आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याबाबत विचार व्हावा. ब्रेमेन चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पुणे महानगरपालिकेने तातडीने करावं. कृषी महाविद्यालय ते सिंचननगर मैदानाकडून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारची वाहतूक वळविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बसस्थानक कामाचा आराखडा प्राप्त झाला असून पुढील अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण करण्यात येईल,असे हर्डीकर यांनी सांगितले.

यशदाला देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था करा

उपमुख्यमंत्री पवार यांनी यशदाच्या मास्टर प्लॅनचा आढावा घेतला. यशदाला भारतातील सर्वोत्तम संस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. आदर्श आराखड्यासाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि त्यातून उत्तम कल्पनांचा समावेश अंतिम आराखड्यात करावा. बैठकीला यशदाचे अतिरिक्त महासंचालक सचिंद्र प्रताप सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Ajit Pawar On Pune Metro
Aditya Thackeray On Shinde: 'बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही', शिंदेवर निशाणा साधत आदित्य ठाकरे काय म्हणाले? जाणून घ्या

उपमुख्यमंत्र्यांसमोर सहकार भवनचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे उपस्थित होते. आराखड्यात सभागृहाची क्षमता वाढविण्याबाबत विचार करावा, साखर संकुल आणि पणन विभागाची गरजही लक्षात घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

Ajit Pawar On Pune Metro
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण सिद्ध होणार?, आयोगाकडून २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com