Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरवारी काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Pune water Issue: पुण्याच्या पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम करायचे असल्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.
Water Cut
Water CutSaam Tv

सचिन जाधव, पुणे

Pune Water Cut News:

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्याच्या पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम करायचे असल्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. (Latest Marathi News)

Water Cut
Mumbai Property Tax: मुंबईकरांसाठी खुशखबर! यावर्षीही मालमत्ता कर वाढणार नाही; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गुरुवारी पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे (एचएलआर) विद्युत, पंप व स्थापत्य विषयीची कामे करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील सहकारनगर, गुलटेकडी परिसर, कोंढवा, पर्वती, धनकवडी, कात्रज परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Cut
MPSC: मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

पाणी पुरवठा बंद असणारा परिसर पुढीलप्रमाणे :

सहकारनगर, पद्मावती, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायसप्लॉट, ढोलेमळा, सॅलिसबरी पार्क, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, बिबवेवाडी गावठाण, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतापणीनगर, भाग एक व दोन, लेकटाऊन, शिवतेजनगर,लोअर इंदिरानगर,

गिरीधरभवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द (सर्व्हे क्रमांक ४२, ४६) परिसर, पर्वती टॅंकर भरणा केंद्र, कात्रज, धनकवडी या परिसरामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com