MPSC: मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

shinde government News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचाविण्यासाठी शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
MPSC exam
MPSC examSaamTv
Published On

Maharashtra Public Service Commission News :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचाविण्यासाठी शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाकडील प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबईकरांपासून ते बेरोजगार, ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेण्यात आले. तसेच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचाविण्याठी निर्णय घेण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MPSC exam
Dharavi Redevelopment : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देण्यास मान्यता

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि निकाल लांबत जात असल्याची तक्रार विद्यार्थी विभागाकडे करत होते. या बाबींमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरत होती. तसेच विद्यार्थ्यांकडून एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलनेही केली जात होती. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडील न्यायालयीन प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी एक वरिष्ठ विधी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच आयोगाची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी एक जनसंपर्क अधिकारी प्रतिनियुक्तीवर नियुक्त करण्यात येणार आहे.

MPSC exam
Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली? वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ आहे. मात्र आता स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या गतीमान कामकाज होणार आहे. तसेच नवीन मंडळ कार्यालयासाठी १७ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातील १० नियमीत पदे व ७ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com