Pune Breaking News: Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: मित्रांसोबत पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ घडला; तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Pune Breaking News: दोन दिवसांपूर्वी अहमदनगरजवळ प्रवरा नदीत एसडीआरएफ जवानांची बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता.

दिलीप कांबळे

तळेगाव, ता. २५ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध नद्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदनगरजवळ प्रवरा नदीत एसडीआरएफ जवानांची बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरण कार्यालयाशेजारील तळ्यातील पाण्यात बुडून आंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिकेत घनश्याम तिवारी असे बुडालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दोन मित्र आणि एका मैत्रिणीसह महावितरण कार्यालयाशेजारील तळ्यात बोटिंग करण्याच्या उद्देशाने गेला होता. मात्र बोट क्लब बंद असल्याने ते चौघे बोटी शेजारच्या पाण्यात उतरले.

अनिकेत हात-पाय मारत पुढे गेला. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बाकीच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र अनिकेत पाण्यात बुडाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आयएनएस शिवाजी आदींच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले.

शोधपथकांनी मृतदेहाचा शोध घेतला. त्यानंतर अनिकेतचा मृतदेह शोधण्यात यश आले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळासाहेब एरंडे उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT